Selections from the Peshwa Daftar 21.96.12
Selections from the Peshwa Daftar 21.96.12
- Language
- Marathi
21.96.12
2292 राहिला नाही. शहर मातबर म्हणून घरोघर पटी करून चाळीस पन्नास लाख रुपये जमा जाले तरी न कळे. वरकड काहीं नाही. वजिरास दोन क्रोड रुपये मागतात. त्याणी पंचवीस लाख कबूल केले आहेत. नाही तरी जीव हजीर आहे येसे साफ म्हणतात. खानखानास येक क्रोड रुपये मागतात तो कवडी देत नाही. अबदालीनी बापूजी माहादेव यांस पुसिलें कीं तुम्ही आपल्या खावंदाची अर्जी दिल्ही असतां राजा अंताजी माणकेश्वर आमचे फौजेसी लढाई कजाखी करीत कां फिरतो ? तेव्हा बापूनी सालजाब केला जे हा बाळाजीरायाचा चाकर नाही, वजिराचा चाकर आहे, त्याजवरी फौज पाठऊन तंबी करणे. तेव्हां नजीबखानास अबदालीनें बोलावून सांगितले कीं, वजीर कैदेत, पातशाहा कैदेत. किला माझा. तुम्ही सारे भेटला, कोणी पलाले असतां राजा अंताजी पंडित हें कां काम करितो ? नजीबखानाने जाब दिल्हा कीं हा त्यांच्या घरचा मातबर सरदार आहे, वजिराचा चाकर नाही. तेव्हां नजीबखानास आज्ञा जाली कीं अंताजीपंतास पत्रें तुम्ही पाठऊन त्याचा इरादा व मतलब काये आहे तें मनास आणणे. त्याजवरून नजीबखान रोहिले याचें पत्र बजिनस आले कीं तुमचा मतलब काये आहे ? भेटी घेणे. त्याचे उतर आम्ही पाठविले जे वजीर भेटावयास गेले ते फार सुख पावले. आम्ही तरी त्यांचे हमजात पाचसातसे मारिले आहेत व फौजबंद आहो. हिंदूचा परमद्वेषी; आम्ही भेटत नाहीं. परंतु मुदा हाच कीं श्रीमंत स्वामीचा अमल जेथवरी आहे त्या मुलुकास काडीइतका उपसर्ग न द्यावा, येक राऊत श्रीमंताच्या मुलुकात न पाठवावा हाच कौलकरार इमानप्रमाण करावें. आम्ही सर्रोन आपल्या मुलुकाच्या मेंब्यांवरीं जाऊन. जरीकरितां येका खेड्यास उपद्रव लागला तरी आम्ही व समसेरबाहादर नारो शंकर व गोविंद बलाल याचे पुत्र वगैरे व सुरजमल जाट आम्ही येकत्र होऊन जे खिजमतगारी घडेल तें करून ऐसा जाब वकील नजीबखानाकडे पाठविला. अबदालीने सांगितलें कीं मी अटक उतरलियापासून दिलीपरियेंत येकाने तरवार ब्रोटिली नाहीं. येथें अंताजीने मात्र येवढें काम केलें. तस्मात मराठे भारी. अतिशय मराठियांचा धाक वागवितो. परंतु बापूजी माहादेव यास आमचा उत्कर्ष न साहावे. तो नानाप्रकारे आम्हावरी प्रयोग करितो. सुरजमल आपल्या ठिकाणीच आहेत. नित्य येतों येसीच पत्रें पाठवितात. त्रिंबक मुकुंद सुभेदार यांस जाठाकडे पाठविलें. त्याणे आम्हासच बोलाविले. आपण येत नाही. पातशाही गेली आतां तेथे आपलें काये काम आहे ?