Pramāṇa · Search · About · API

Selections from the Peshwa Daftar 21.96: [30-1-1757] In this lenghty document Antaji Manakeshwar traces the success of the Abdali to the treachery of Najib and other chiefs of the Delhi court who openly sided with him when he drew near the capital, and welcomed him. The Vazir Gaziuddin, a staunch adherent of the Marathas, surrendered to the invader an

Selections from the Peshwa Daftar 21.96

Language
Marathi

[30-1-1757] In this lenghty document Antaji Manakeshwar traces the success of the Abdali to the treachery of Najib and other chiefs of the Delhi court who openly sided with him when he drew near the capital, and welcomed him. The Vazir Gaziuddin, a staunch adherent of the Marathas, surrendered to the invader an

21.96.1

पौ छ १४ रजब

21.96.2

[seal: श्री]

21.96.3

श्रीमंत राजश्री पंतप्रधान स्वामीचे शेवेसी

21.96.4

विनंती सेवक अंताजी माणकेश्वर कृतानेक सां नमस्कार विज्ञापना. सेवकाचें वर्तमान ताा माघ शुध १० मुकाम खिदराबाद नजीक इंद्रप्रस्थ

21.96.5

2289

21.96.6

Ca 7-14 च्यार कोस स्वामीचे कृपेकरून वर्तमान यथास्थित असे विशेष. सविस्तर वर्तमान पेसजी लिहिले ते विदित जाले असेल * * (पुढील दोन तीन ओळी मजकूर फाटला आहे * * ) द्वाही फिरविली * * (खान) खानास वजारतीचा खिलत दिल्हा. * * * खानजि * * या खानाचा पुत्र त्यास वकील मुतलख केले. याप्रमाणे करून किल्यात आणून पोहचाविलें. व गाजदीखान कदीम वजीर यांस कैदैत ठेविले आहेत. सुरजमल जाट व नागरमल व नजीबखान रोहिले वगैरे सर्वांची अर्जी याप्रमाणेच होती कीं गाजुदीखान राजश्री मल्हारजी होळकर यांचा पुत्र व श्रीमंत राजश्री दादासाहेब याचा पगडीबंद भाऊ, याजला कायम न करावें. सारी सलतनैत मराठ्यांच्या घरांत घातली आहे. याचें घर खाणून झाडा घेणे. यास सोडाल तरी मागती मराठ्यास जाऊन भेटून आमचा सत्यानाश करील. (पुढील सुमारें तीन ओळी मजकूर फाटला आहे.) सारांश चकत्याचा हक त्यांस नादरशहाप्रमाणे दिल्हा. वजीर मात्र मऱ्हाठ्यांचे आदावतीने दुसरा केला. पुढें पातशाही करावयास अबदाली राहात नाही यैसे दिसते. महिनाभर राहून पैसाटका जमा करून जाईल यैसा रंग दिसतो; परंतु जालें वर्तमान सेवेसी लिहिले आहे. आम्ही श्रीमंत राजश्री दादासाहेबांस दो च्यार वेळा लिहिलें आहे. यासमई स्वारी येऊन पोहचती तरी सर्व होते. अबदालीस आणखी महिना पंधरा दिवस येथें लागतील इतकियांत श्रीमंताची स्वारी आलीवरी जें चाहतील तें करितील. असो. पुढें होईल वर्तमान तें लिहून पाठऊन. प्रस्तुत आम्ही येथें नजीक राहावें उतम नाही. नाहक रात्रदिवस मुदैई दंगा करवितील याकरितां मथुरेस राहून जैसे होईल तैसे पाहून दिलीपासून पंचवीस तीस कोस राहून. विदित जालें पाहिजे. यापूर्वींचें वर्तमान तरी माघ शुध प्रतिपदेस नजीबखान रोहिले अबदालीस जाऊन मिळाले व दिलीतील सैदसलाबतखान व खानखाना व सेरजंग व बापूजी माहादेव वकील वगैरे जितके होते त्याणी मिलोन आजी दोन महिने अबदालीस पत्रें पाठऊन आणविले. ते जाऊन भेटलें. तेव्हां नवाब व पातशाहाची हिंमत उठली कीं आधी शत्रू भारी, त्यांत घरची फौज जाऊन भेटली. तेव्हां वजीरानी आपली स्वारी तयार करविली कीं, अबदाआलीस जाऊन भेटावें. आतां

21.96.7

[१ दौलत.]

21.96.8

[२ दंगेखोर.]

21.96.9

2290 त्यांस किल्यांत आणावें. झाडा शहरचा व किल्याचा द्यावा मग तो जे करील तो करो. तों आम्हास अगोधरच दोन दिवस सडे फौजेनसी दिलीपासून पुढें वजीरानी रवाना केलें होतें. तेहि तिकडून आले. दिलीपासून साहा कोसावरी अबदालीच्या वजिराची व आमची लढाई जाली ते फारच जाली. आमची घोडीं माणसें फार पडलीं. आम्ही माघारे सरोन दोन कोसीं राहिलो. त्याचा मुकाम दिलीपासून साहा कोसांवरी जाला. इतकियांत प्रातःकाली गाजदीखान वजीर अबदालीस जाऊन भेटला. तमाम दिलीचे फितुरी अगोधरच जाऊन भेटिले होते. खानसामा व नागरमल व बालगोविंद सावकार वगैरे निमे लोक पलोन जाटाकडे गेले. आम्ही प्रातःकालीं घोड्यावर बसतांच पुढें अबदालीची फौज, मागें नजीबखान रोहिल्याची फौज. आम्हावरी चढाई केली. तेंसमई आम्हास निघोन किल्याखालें रेतींत आमच्या लस्करांत येताना मोठे अरिष्ट आम्हावरी पडत गेले. तेव्हाहि लढाई भारी पडली परंतु बुनगियांत येऊन हती कंबिले बुनगे सर्व तयार करून पुढें घालून, पाठीवरी फौज येसा कजिया होत फरिदाबादपरियेंत आलो. मग त्यांचा लाग उठला. तेंव्हांहि लढाई आम्हावरी भारीच पडली परंतु स्वामीच्या प्रतापेंकरून लस्करचा सुतलीचा तोडा जाऊं न दिल्हा. फरिदाबादेस पावलो. खोज्याचे सराईहून तेहि फिरले. अबदाली ते दिवशीं शहराभोंवत राहिला. कांही फौज पटपटगंजावरी येमुनापार राहिली. कांहीं आमच्या तलावारी राहिली. वजीर गाजदीखान याजवळ चौकी बसविली आणि जागा जागा त्यांचे समागमी फोडून फोडून पृथकं पृथक (पुढील दोन ओळी मजकूर फाटला आहे.) नजीबखान रोहिला येऊन किल्यातील पातशाही लोक झाडून काढून दिल्हे. पातशाहा पुत्रासमेत कबिलेदेखील पूर्वस्थल त्यांचे होते त्यांत नेऊन कारागृही घातले. तमाम पातशाही लोक किल्यांतून काढून दिल्हे. अबदालीनें आपला बंदोबस्त केला. बक्षी किल्यांत ठेऊन किल्याची सारी तयारी करविली. जवाहीरखाना, सिलेख़ाना, जामदारखाना वगैरे झाडून जप्ती केली. शहरांत द्वाही फिरविली. कुतबा पढले. झाडून बंदोबस्त केला आहे. सारांश गोष्टी अबदालीची फौज चाळीस पनास हजार सारी आहे. दिलीस काही भारी नव्हतें. परंतु येथून खानखाना, बापू वकील, नजीबखान सैदसलाबतखान नागरमल पाचसात मिलोन त्याजकडे वकील पाठऊन भेद देऊन त्यास दरकूच साहा कोसांवरी आणून वीस हजार स्वार येकदांच भेटीस गेला. तेव्हां खानसामा व नागरमल व बाहादरखान बलोच हे मोर्च्यास म्हणून गेले ते तिकडेच सुरजमलाकडे गेले. दामोदर माहादेव तिघे भाऊ व जलालुदीखान (पुढील एक किंवा दोन ओळ मजकूर फाटला आहे.)

21.96.10

2291 म्हणून त्यास आणावयास निघाले. कनिले खजाना सर्व घेऊन गेले. येक बापू व त्रिंबकवंत दोघे संडे मात्र जब्रात राहिले. तेहि जाऊन भेटिले. याप्रमाणे दिलीची अवस्था जाली. याउपरी येक आम्हीच फसलो. वजीर घाबरा जाला. सारी फौज पाच हजार वजीराजवल राहिली. अवसान न पुरे मग जाऊन भेटिले. ते मात्रागमनी. त्याणी कैद केले. आम्ही फरिदाबादेस बुनगे आणून घालविलें. दुसरे दिवसीं बुनगियात दोन हजार फौज ठेऊन मथुरेस रवाना केलें. आम्ही फरिदाबादेसून बंदरपूरचे सराइंस दिलीपासोन साहा कोसावरी संडे फौजेनसी जाऊन मुकाम केला. दुसेर दिवसीं सरवरखान अबदालीच्या वजिराचा सरदार च्यार हजार फौजेनसी बारापुलाअलीकडे तीन कोस आम्हावरी चालोन आला. आम्ही तयार जालो. येक प्रहर लढाई जाली. त्याजवल तोफखाना नवता. त्याचा मोड जाला. स्वामीच्या शेवकास यश आले. च्यारसें घोडे पाडाव आले. त्याणी आपलीच घोडी च्यारसें मारली. च्यार-पाचसे अबदालीचे हेैमजात रणात मारिले गेले. निशाणे नगारे घेतले. मोडून बारापुलापरियेंत घातले. त्याआलीकडे आम्हावरी आजितागायेत फौज त्यांची आली नाही. आजी बापूजी माहादेव याणी त्यास बीरै देऊन नजीबखान व अबदालीचे जाहानखान वीस हजार फौज आम्हावरी रवाना केली आहे. दोन कोस आल्यावरी आम्ही दाहा कोस टाला देऊन मागती सालेमाराकडे जाऊन येका रात्रीतून तीन जागा घोड्यावरी बसून फिरतो. स्वामी म्हणतील कीं पातशाही त्याणी घेतली असतां तुम्ही कां तेथें खराब होता व घोडी माणसें मारीत फिरता? तरी आम्ही येथून निघतांच अंतरवेद झाडून गेली. येक माणूस अबदालीचे दहशतींने राहात नाही. आम्ही थोडेच आहोत परंतु दोन लढाया मातबर जुजोन पांचसातसे माणूस त्याचे मारिलें. त्याजमुळे दहशत भारीच वागवितात. बापूजी माहादेव याणी स्वामीच्या नावाची अर्जी अबदालीस दिल्ही कीं लाख फौजेनसी चाकरीस हजीर आहो व पातशाही मुलूक अंतरवेदीचा सोडून देतो. तमाम मवास मारून पेशकश आणून खजानादाखल करितो यैसी अर्जी दिल्ही. त्यावरून बापूस खिलत दिल्हा. मेहरबान जाले. शहर तमाम नागऊन दोन क्रोड रुपये तहसील करून बोला धरून पैका खजानियात देतो येसा तिघानी करार करून खिलत घेतले. येक राजा जुगलकिसोर वकील बंगाला, किसनचंद वकील पठाणाचा तिसरा बापू वकील परंतु शहरात येक माणूस मातबर कोणी

21.96.11

[१ मोठेमोठे. ' २ भर.]

21.96.12

2292 राहिला नाही. शहर मातबर म्हणून घरोघर पटी करून चाळीस पन्नास लाख रुपये जमा जाले तरी न कळे. वरकड काहीं नाही. वजिरास दोन क्रोड रुपये मागतात. त्याणी पंचवीस लाख कबूल केले आहेत. नाही तरी जीव हजीर आहे येसे साफ म्हणतात. खानखानास येक क्रोड रुपये मागतात तो कवडी देत नाही. अबदालीनी बापूजी माहादेव यांस पुसिलें कीं तुम्ही आपल्या खावंदाची अर्जी दिल्ही असतां राजा अंताजी माणकेश्वर आमचे फौजेसी लढाई कजाखी करीत कां फिरतो ? तेव्हा बापूनी सालजाब केला जे हा बाळाजीरायाचा चाकर नाही, वजिराचा चाकर आहे, त्याजवरी फौज पाठऊन तंबी करणे. तेव्हां नजीबखानास अबदालीनें बोलावून सांगितले कीं, वजीर कैदेत, पातशाहा कैदेत. किला माझा. तुम्ही सारे भेटला, कोणी पलाले असतां राजा अंताजी पंडित हें कां काम करितो ? नजीबखानाने जाब दिल्हा कीं हा त्यांच्या घरचा मातबर सरदार आहे, वजिराचा चाकर नाही. तेव्हां नजीबखानास आज्ञा जाली कीं अंताजीपंतास पत्रें तुम्ही पाठऊन त्याचा इरादा व मतलब काये आहे तें मनास आणणे. त्याजवरून नजीबखान रोहिले याचें पत्र बजिनस आले कीं तुमचा मतलब काये आहे ? भेटी घेणे. त्याचे उतर आम्ही पाठविले जे वजीर भेटावयास गेले ते फार सुख पावले. आम्ही तरी त्यांचे हमजात पाचसातसे मारिले आहेत व फौजबंद आहो. हिंदूचा परमद्वेषी; आम्ही भेटत नाहीं. परंतु मुदा हाच कीं श्रीमंत स्वामीचा अमल जेथवरी आहे त्या मुलुकास काडीइतका उपसर्ग न द्यावा, येक राऊत श्रीमंताच्या मुलुकात न पाठवावा हाच कौलकरार इमानप्रमाण करावें. आम्ही सर्रोन आपल्या मुलुकाच्या मेंब्यांवरीं जाऊन. जरीकरितां येका खेड्यास उपद्रव लागला तरी आम्ही व समसेरबाहादर नारो शंकर व गोविंद बलाल याचे पुत्र वगैरे व सुरजमल जाट आम्ही येकत्र होऊन जे खिजमतगारी घडेल तें करून ऐसा जाब वकील नजीबखानाकडे पाठविला. अबदालीने सांगितलें कीं मी अटक उतरलियापासून दिलीपरियेंत येकाने तरवार ब्रोटिली नाहीं. येथें अंताजीने मात्र येवढें काम केलें. तस्मात मराठे भारी. अतिशय मराठियांचा धाक वागवितो. परंतु बापूजी माहादेव यास आमचा उत्कर्ष न साहावे. तो नानाप्रकारे आम्हावरी प्रयोग करितो. सुरजमल आपल्या ठिकाणीच आहेत. नित्य येतों येसीच पत्रें पाठवितात. त्रिंबक मुकुंद सुभेदार यांस जाठाकडे पाठविलें. त्याणे आम्हासच बोलाविले. आपण येत नाही. पातशाही गेली आतां तेथे आपलें काये काम आहे ?

21.96.13

[१ सीमेवर.]

21.96.14

आपले जागा राखोन राहावे येसा जाब पाठविला. येका गावास मथुरेजवल मोर्चे लाऊन बसला आहे. समसेर बाहादर तरी नारो शंकरानी आजी दोन महिने फौजेसुधां आमच्या मुलुकात गोहद पछोरच्या गांवगनास मोर्चे लाऊन लुटून खंडणिया घेतात. दाहा पत्रं वजिराचीं व आमचीं गेली परंतु येत नाहीत. हे जालियावरी तीन पत्रं आजी दाहा रोजांत पाठविली कीं सडे यावे येथे शह देऊन. परंतु ते समर्थ, नारो शंकर त्यांचे मंत्री. गोविंदपंताच्या पुत्रास व त्रिंबकराऊ धोंडोपंत यांस पत्रं पाठविलीं त्याणी लिहिलें कीं पैका देणे. तेव्हां आम्ही लिहिले कीं नालबंदी व रोजमरा आम्हीच देतो, येणे. परंतु येत नाहीत, अथवा अंतरवेदींत जमा होऊन मेंड्यावरी येत नाहीत. तीन लढाया मिलोन दोनसे घोडे पडिले. दोनसे माणूस कामास आले. जखमी घोडे माणूस फार आहे. असो. कल्यांत शहरांत बंदोबस्त झाडून जाला. जे पलाले ते गेले. राहिाले ते अबदालीचे कैदेत आहेत. जेवढें फितुरी तेवढे मात्र मोकले आहेत. रोहिले वगैरे याणी मोठा दगा केला. जरी सरकारची फौज चालीस हजार असती तरी यांस बुडऊन हिंदुस्थानची पातशाही स्वामीची होती. जरी हा ठरला तरी भारीच आहे. साल गुदस्ता मारवाडचे मोहिमेस नवे फौजेची दरोबस्त नेमणूक नाही व हलीं सालची दरोबस्त येका रुपयाची नेमणूक नाही. यैवज अंतरवेदीचा आमचे जागिरीचा गोविंद बलाल यांकडे इटावे सकुराबाद फफुंदचा यैवज इजारियाप्रो होता तो यैवज येणे. त्यास त्यांची आमची भेट भाद्रपदमासीं जाली. पंतानी आपल्या पुत्रावरी चिठी करून दिल्ही कीं, दसरा करून यैवज देणे. देखील कबजे घेतली आणि गोविंदपंत देशास गेले. मागून पुत्रास चिंठी पाठविली की, येक रुपया सरंजामाचा न देणे. श्रीमंतपंतानी पैका आम्हापासून घेतला आणि अंताजीपंतास न देणे म्हणून सांगितला. त्याजवरून कवडी त्याणी दिल्ही नाही. फुकाचें भेटिले नाहीत. कागद पाठविले त्याचें उत्तर पाठविले कीं तुमचे आमचे नातें काये आहे ? येक ग्वालेरीचा मख्ता येक लाख पस्तीस हजार. तो शागीर्दपेशास पाहिजेत. तेव्हा दरोबस्त सालाची फौज बारा हजार त्यांच्या कबजास ठिकाणच नाही. स्वामी म्हणतील जाजती फौज का ठेविली तरी बजिनसं जनकोजी सिंदे याच्या पत्रा * * * गेलो दिल्हाची मनस * * * * * * * येथे स्वरूप * * * * * * * म्हणून ठेविली होतीच व जागा * * * करून माहाल नेमणूक करून सनदा घेतल्या. नेहमीच स्वामीच्या घरात जागा केली होती. परंतु त्यांच्याच घरास आग लागली. जागाहि अबदालीने मारून आपला दस्त केला यासी इलाज काय ?

21.96.15

2294 अंतरवेदीचा बंदोबस्त राहावा म्हणून पातशाही चाकरी करार करून येथेहि थोडी बहुत जागा करून घेतली होती. लाला बाल गोविंद या * * व सेट नगरसेट याणी थोरपणा करून आजीतागायेत कर्ज देऊन चालविलें. समजाविसी नालबंदीस ठिकाणा नाहीं. याउपरी राा गोविंद बलाल यास उत्तम प्रकारें ताकीद करून अंतरवेदीचा आमच्या जागिरीचा येवज तूर्त इजारियाप्रमाणे देवावा म्हणजे परभारे तेवढा तरी येवज नगरसेट बाल गोविंद यांस पावता करून पुढें स्वामीची भेटी जालियावरी फौजेचा हिसेब पाहून. मग फौजेची (पुढील चार पांच ओली मजकुर फाटण्यांत गेला) मारवाडची मोहीम निक(डीने) केली. येंदा अंतरवेदीचा बेहदा उठला. कोणीच न राहात तेव्हां हेहि कबूल करून बहदा राखिला. पुढे अबदालीचा हंगामा जाला. आपल्या जिवापेक्षा जेथवरी होते तेथवरी चुकत नाही. या चाकरीचा मजुरा स्वामीच्या ध्यानात येऊन सेवकाचा मजुरा न जाला तरी आमचें दैव खोटे. सारांश सावकारानी पैका स्वामीच्या नावावरी पंधरा लाख रुपये चारिले. त्यास जाग़ाहि केला होता. ईश्वरे त्यास अपाये केला इलाज नाहीं. स्वामीच्या सरकारकामासाठीं हें डोईवरी घेतलें. परंतु स्वामीच्या वरकड सरदारानी रिकामेरानीं आमचा तमासाच पाहिला. परंतु येकानेंहि उपराला केला नाहीं यावरून अपूर्व आहे. सारे चाकर मेहेरवानीचे. आम्ही इतराजीचे चाकर ! परंतु आपल्या दैवें घ्यावें. येथून आम्ही कागद पाच सात वेळा श्रीमंत राजश्री दादासाहेबांस व राजश्री मल्हारजी होळकर सुभेदार यांस लिहिलीच आहेत. सेवेसी विदित जाले पाहिजे. श्रीमंत मातुश्री सगुणाबाई श्रीप्रयागास माघस्नानास आली आहेत. त्यांचीं पत्रें आम्हास आलीं कीं माघस्नान करून मथुरेस यात्रा करून जेष्ट मासीं देशास जावयाचें आहे तरी तिकडील वर्तमान सुरक्षित असिले तरी व. तुमचे विचारें यावें यसें असिलें तरी उतर पाठवणे म्हणजे येऊं. त्यास पत्राचें उतर आम्ही पाठविले आहे कीं, तूर्त आबादालीची धामधूम फार आहे, हा प्रसंग उतम नाही. माघस्नान करून काळपीवरून देशास जावें, मथुरेस येणेस वाट उतम नाही यैसे लिहिलें आहे. स्वामीस विदित व्हावें म्हणऊन सेवेसी विनती लिहिली असे. सुरजमल जाठ नागरमल खानखाना बापू वकील यानी सतंतर पनास लाख रुपये नेहमी निराळी बशर्ती नजर करार आबदालीसी केली आहे की गाजदीखानांस नेहमी आटकपार धरून न्यावे. हिंदुस्थानात न ठेवावे. हिंदुस्थानात राहिला तरी मराठे त्याचे साहित्य करितील आणि (पुढील दोन तीन ओळी फाटल्या) पैसा घेतील याप्रो * * * मसलत पकी ठरली आहे हे विज्ञापना.

21.96.16

[१ अमल.]

Discussed in (1)