Pramāṇa · Search · About · API

Selections from the Peshwa Daftar 21.96.6

Selections from the Peshwa Daftar 21.96.6

Language
Marathi

21.96.6

Ca 7-14 च्यार कोस स्वामीचे कृपेकरून वर्तमान यथास्थित असे विशेष. सविस्तर वर्तमान पेसजी लिहिले ते विदित जाले असेल * * (पुढील दोन तीन ओळी मजकूर फाटला आहे * * ) द्वाही फिरविली * * (खान) खानास वजारतीचा खिलत दिल्हा. * * * खानजि * * या खानाचा पुत्र त्यास वकील मुतलख केले. याप्रमाणे करून किल्यात आणून पोहचाविलें. व गाजदीखान कदीम वजीर यांस कैदैत ठेविले आहेत. सुरजमल जाट व नागरमल व नजीबखान रोहिले वगैरे सर्वांची अर्जी याप्रमाणेच होती कीं गाजुदीखान राजश्री मल्हारजी होळकर यांचा पुत्र व श्रीमंत राजश्री दादासाहेब याचा पगडीबंद भाऊ, याजला कायम न करावें. सारी सलतनैत मराठ्यांच्या घरांत घातली आहे. याचें घर खाणून झाडा घेणे. यास सोडाल तरी मागती मराठ्यास जाऊन भेटून आमचा सत्यानाश करील. (पुढील सुमारें तीन ओळी मजकूर फाटला आहे.) सारांश चकत्याचा हक त्यांस नादरशहाप्रमाणे दिल्हा. वजीर मात्र मऱ्हाठ्यांचे आदावतीने दुसरा केला. पुढें पातशाही करावयास अबदाली राहात नाही यैसे दिसते. महिनाभर राहून पैसाटका जमा करून जाईल यैसा रंग दिसतो; परंतु जालें वर्तमान सेवेसी लिहिले आहे. आम्ही श्रीमंत राजश्री दादासाहेबांस दो च्यार वेळा लिहिलें आहे. यासमई स्वारी येऊन पोहचती तरी सर्व होते. अबदालीस आणखी महिना पंधरा दिवस येथें लागतील इतकियांत श्रीमंताची स्वारी आलीवरी जें चाहतील तें करितील. असो. पुढें होईल वर्तमान तें लिहून पाठऊन. प्रस्तुत आम्ही येथें नजीक राहावें उतम नाही. नाहक रात्रदिवस मुदैई दंगा करवितील याकरितां मथुरेस राहून जैसे होईल तैसे पाहून दिलीपासून पंचवीस तीस कोस राहून. विदित जालें पाहिजे. यापूर्वींचें वर्तमान तरी माघ शुध प्रतिपदेस नजीबखान रोहिले अबदालीस जाऊन मिळाले व दिलीतील सैदसलाबतखान व खानखाना व सेरजंग व बापूजी माहादेव वकील वगैरे जितके होते त्याणी मिलोन आजी दोन महिने अबदालीस पत्रें पाठऊन आणविले. ते जाऊन भेटलें. तेव्हां नवाब व पातशाहाची हिंमत उठली कीं आधी शत्रू भारी, त्यांत घरची फौज जाऊन भेटली. तेव्हां वजीरानी आपली स्वारी तयार करविली कीं, अबदाआलीस जाऊन भेटावें. आतां