Pramāṇa · Search · About · API

Selections from the Peshwa Daftar 21.96.9

Selections from the Peshwa Daftar 21.96.9

Language
Marathi

21.96.9

2290 त्यांस किल्यांत आणावें. झाडा शहरचा व किल्याचा द्यावा मग तो जे करील तो करो. तों आम्हास अगोधरच दोन दिवस सडे फौजेनसी दिलीपासून पुढें वजीरानी रवाना केलें होतें. तेहि तिकडून आले. दिलीपासून साहा कोसावरी अबदालीच्या वजिराची व आमची लढाई जाली ते फारच जाली. आमची घोडीं माणसें फार पडलीं. आम्ही माघारे सरोन दोन कोसीं राहिलो. त्याचा मुकाम दिलीपासून साहा कोसांवरी जाला. इतकियांत प्रातःकाली गाजदीखान वजीर अबदालीस जाऊन भेटला. तमाम दिलीचे फितुरी अगोधरच जाऊन भेटिले होते. खानसामा व नागरमल व बालगोविंद सावकार वगैरे निमे लोक पलोन जाटाकडे गेले. आम्ही प्रातःकालीं घोड्यावर बसतांच पुढें अबदालीची फौज, मागें नजीबखान रोहिल्याची फौज. आम्हावरी चढाई केली. तेंसमई आम्हास निघोन किल्याखालें रेतींत आमच्या लस्करांत येताना मोठे अरिष्ट आम्हावरी पडत गेले. तेव्हाहि लढाई भारी पडली परंतु बुनगियांत येऊन हती कंबिले बुनगे सर्व तयार करून पुढें घालून, पाठीवरी फौज येसा कजिया होत फरिदाबादपरियेंत आलो. मग त्यांचा लाग उठला. तेंव्हांहि लढाई आम्हावरी भारीच पडली परंतु स्वामीच्या प्रतापेंकरून लस्करचा सुतलीचा तोडा जाऊं न दिल्हा. फरिदाबादेस पावलो. खोज्याचे सराईहून तेहि फिरले. अबदाली ते दिवशीं शहराभोंवत राहिला. कांही फौज पटपटगंजावरी येमुनापार राहिली. कांहीं आमच्या तलावारी राहिली. वजीर गाजदीखान याजवळ चौकी बसविली आणि जागा जागा त्यांचे समागमी फोडून फोडून पृथकं पृथक (पुढील दोन ओळी मजकूर फाटला आहे.) नजीबखान रोहिला येऊन किल्यातील पातशाही लोक झाडून काढून दिल्हे. पातशाहा पुत्रासमेत कबिलेदेखील पूर्वस्थल त्यांचे होते त्यांत नेऊन कारागृही घातले. तमाम पातशाही लोक किल्यांतून काढून दिल्हे. अबदालीनें आपला बंदोबस्त केला. बक्षी किल्यांत ठेऊन किल्याची सारी तयारी करविली. जवाहीरखाना, सिलेख़ाना, जामदारखाना वगैरे झाडून जप्ती केली. शहरांत द्वाही फिरविली. कुतबा पढले. झाडून बंदोबस्त केला आहे. सारांश गोष्टी अबदालीची फौज चाळीस पनास हजार सारी आहे. दिलीस काही भारी नव्हतें. परंतु येथून खानखाना, बापू वकील, नजीबखान सैदसलाबतखान नागरमल पाचसात मिलोन त्याजकडे वकील पाठऊन भेद देऊन त्यास दरकूच साहा कोसांवरी आणून वीस हजार स्वार येकदांच भेटीस गेला. तेव्हां खानसामा व नागरमल व बाहादरखान बलोच हे मोर्च्यास म्हणून गेले ते तिकडेच सुरजमलाकडे गेले. दामोदर माहादेव तिघे भाऊ व जलालुदीखान (पुढील एक किंवा दोन ओळ मजकूर फाटला आहे.)