Selections from the Peshwa Daftar 21.97: [January 1757 ?] Antaji Manakeshwar and some other Sardar informing Raghoba that they are moving towards Orcha according to instructions.
Selections from the Peshwa Daftar 21.97
- Language
- Marathi
21.97
सेवेसी विज्ञापना. स्वामीचें आज्ञापत्र आले कीं तुम्ही व राजश्री अंताजी माणकेस्वर येसे स्वार होऊन राजश्री नारो शंकर याजकडे वोडशे प्रांतास जाणे. त्यांवरून सिधता करीत आहो. परंतु दीड महिना रोजमरा पाहिजे. निसबतीचे लोक देखील सोलासत्रासे राऊताचा भरणा आहे. रोजमऱ्याची बेगमी करून देणार स्वामी समर्थ आहेत सेवेसी श्रुत होये हे विज्ञाति.