Selections from the Peshwa Daftar 21.98: [6-2-1757] Laxman Apaji writes how Delhi is being squeezed of its wealth by the Abdali. The Maratha army is shortly expected to attack him.
Selections from the Peshwa Daftar 21.98
- Language
- Marathi
21.98
श्रीशंकर
राजश्रियाविराजित राजमान्यविराजित राजश्री
विष्णुपंत दाजी स्वामीचे सेवेसी
पोष्य लक्ष्मण आपाजी कृतानेक साष्टांग नमस्कार विनंती उपरी. येथील क्षेम तागाईत छ १६ माहे जमादिलाखर मुकाम मौजे पाडला परगणे गंगराड नजीक चेमेली, आपले कृपेंकरून यथास्थित असें विशेष. दिलीकडील वर्तमान तरी आबदालीनें तमाम शहरांतील हवेल्या खणोन मालमालियेत काढून नेली. तीन च्यार क्रोडी माल सांपडला. लेकाबरोबर देऊन आपले देशास खाना केलान; आपण शहरांतून निघोन सालेमारबागाजवळ राहिला आहे. आमच्या फौजा
2296 पळवलेवर आहेत. आठां चौरोन्जांहीं त्याची याची गांड पडेल. बरीशी होणार आहे. खानखाना वजिरी करितो, गाजुदिखान त्याचे कैदेत आहे. वरकड वर्तमान राजश्री भास्करपंतीं लिहिलें आहे त्याजवरून विदित होईल. आपण सत्वर यावें. मातुश्री ताईंचीं पत्रें आलीं तीं पाठविलीं आहेत. बहुत काय लिहिणें कृपा लोभ कीजें हे विनंती.
हेच पत्रीं राजश्री अंताजीपंत व कृष्णाजीपंतास साष्टांग नमस्कार; लोभ करीत जावें हें विनंती.
वेदशास्त्रसंपंन्न राजश्री शास्त्रीबावांस दोनी कर जोडून साष्टांग नमस्कार. कृपा केली पाहिजे हे विज्ञापना.