Pramāṇa · Search · About · API

Selections from the Peshwa Daftar 21.99.2298

Selections from the Peshwa Daftar 21.99.2298

Language
Marathi

21.99.2298

आम्ही इकडे लढाई घात * * त्याचे तोंड आम्हावरी व अगरियाच्या किल्ल्यांत दस्त करावे हे आवई. तेहि इकडेच व सुरजमल मोठी आसामी पैकियाची तीहि इकडे याजकरितां अंतरवेद चुकोन सारा रोख इकडील आम्हाकडीलच जाला आहे व अंतरवेदीत जमीदारानी मात्र कोठे कोठे लबाडी केली असेल तरी न कळे. अबदालीचे कुत्ते (नाही). बाळाजी गोविंद, धोंडो दत्तात्रय, त्रिंबकराऊ सिवदेव अंतरवेदीत दिलीपासून सत्तर कोसावरी आहेत व समसेर बहादर नारो शंकर यानी दोन मास आमच्या ग्वालेरीच्या मुलुकाची सत्यानास करून आतासें भदावरात चमळकांठी आहेत. सारांश गोष्टी आम्ही सर्वास दोन महिने लिहीत गेलो, व आजिं वीस बावीस रोज अलीकडे अबदाली दाखल जालियांवरी सर्वास लिहीत गेलो परंतु सर्वानी आमची मशकरीच केली की अबदाली कोठील ? उगेच आम्हास लटके लिहिलात यसें करून आम्हास सर्वानी घालविले. आमचे घरचे काम नव्हते. हिंदुस्थानची पातशाही सारी स्वामीची आहे. पातशाही राखावी. या पातशाहावरी येहसान करून आणिंक जें याच्या घरात असेल ते सर्व घेऊन यास राखावें म्हणून दाहा बारा हजार आपली मराठी असोन सर्वानी तमाशाच पाहिला. आमचे मात्र घर बुडविलें ! तरी हा महिन्या पंधरा रोजा हिंदुस्थानचा झाडा घेऊन जाईल. आमचे हजारो मेले तो हक आमचा पातशाहीवरी जाला आहे. दिलीच्या पातशाहीसाठीं सगळ्या हिंदुस्थानचे पाच माणुसे (मे)ले नाहीं. आमचे हजारो त्याच्या कामावर मेले. इतका सत्यानास जाला म्हणून चमल उतरून येत नाही. हिंमत सोडीत नाही. श्रीमंत ये तोवरी त्याचे आसपास माराकुटी करीतच फिरतो. स्वामीनी दुसरा अर्थ चित्तात न आणावा. हे जालियांवरी अबदाली व अलमगीर पातशाहा यांसी किलेयात सांगितले * तुझे पातशाहीत निमकहलाल मराठियानी केले. हजारो खासा हजारो घोडे माझे मारिले. थोडके असता हजारो घोडे हजारो माणूस मेले. माझा मुकाबिला घेतला. तुमचे पातशाही राखतील तरी मराठेच राखतील. हिंदुस्थानी निमकहराम आहेत. उगेच न जुजता उठोन मजला भेटिले. मी आपले गरजेरस सर्वासी गोड बोनालो परंतु याची संग्रह कामाची नाहीं. मग जितके पहिले फितुरांस मिलालें होते तितकियास आणून तोंडावरी थुंकला. पैजारा मारिल्या. सर्वांवरी दांड केला. सर्वांच्या हवेलीस खणत्या लाविल्या. खानखाना वजीर केले होते त्यास येक क्रोड रुपये लाऊन कैद केले. हवेली खणितात. नजीबखान रोहिले कैद केले. बापू वकील यांस तीस लाख रुपये (दंड) केला परंतु याने कबुलात लिहून देऊन पैका प्राथकाली भरितो जैसा करार करून रविवारी दिलीहून