Selections from the Peshwa Daftar 21.99.2297
Selections from the Peshwa Daftar 21.99.2297
- Language
- Marathi
21.99.2297
(पहिला बंद गहाळ.)
सेवेसी विज्ञापना. देशीहून कोणी सरदार येत नाही. येक अंताजीस मारून फरिदाबादेवरून काढिले म्हणजे मालवियात अमल तुमचा होईल. अंतरवेद वगैरे जागियाची कथा काये? याप्रा मसलत देऊन खासा अबदालीचा पुत्र व त्याचा वजीर पंनास हजार फौजेतील निवड करून आपले माणसें बा वाटांडें देऊन माघ शुध १४ चतुर्दशी बुधवारी फरिदाबादेवरा दिलीपासून * दाहा कोसावरी दोन प्रहरा दिवसा तीन * फौजा करून आले. ज्याप्रा लिहिले आहे * या प्रां बापूजी माहादेव याची आर्जीच बजिनस आबदालीस होती ती अर्जीच बजिनस मागून आबदालीने पाठविली (ती) आम्हाजवळ आहे. दोप्रहरा तीन फौजाचा गराडा पडिला. निघावयास जागा नाही. आमची फौज पहिली जखमियाबा वगैरे बुनगियात फार होती. आम्हाबा साहा हजार फौज सात हजार मात्र होती. ते संकट जाणून दीढ प्रहर त्यांसी युध्य जाले. चौकडून या रीतीचा वर्षाव. जेथवरी लढाईचा आवर्त (?) लोकाचे सिपाईगिरीची शर्त होती तेथवर केली. ती मेहनत पत्री लिहिता काही सत्य वाटणार नाहीं. त्या समई सातसें आठसे घोडे गोलियाने तरवारानी ठारच त्याच ठिकाणी पडिले. सातसे आठसें लाहाण थोर येक हजार माणूस ठार ठिकाणीच पडिले. जोहर होऊन चुकले. त्यात स्वामीचे दरबारी तरवार मारिली. आसामी दोनसे वरकड लाहाण मोठे स्वार सिलेदार बारगीर मिळोन येक हजार माणूस ठार जाले.
येकाचा मुडदा काढावयास फुरसत नाहीं. च्यार घटिका दिवस राहे तोवरी घोरंदर याप्रा जाले. अबदालीकडील घोडे आमच्या करोलानी तीनसे च्यारसें तेथें मारिले. व सात आठसें पठाण त्याचाहि खासा रणास आला. मग निदान माहासंकट जाणून निघालो. दोन कोसपरियेत मागती पाठीवरी त्याच्या फौजा. हे झोंबी संध्याकालपरियेत आली. संध्याकाल जालियावर तेहि सरोन गेले. आम्ही सरोन माघारे राहिलो. त्यासमई दोनसे तीनसे घोडे आणिाक त्याजकडे उ * व पाडून जखमी होऊन गेले. याप्रा जालियावरी बापूची आर्जिच आबदाली मोहरनसी पाठऊन दिल्ही. लस्करचा सत्यानास जाला तेव्हा चौथे दिवशी मथुरेस बुनगियात आलो. येथे येतांच सुरमजल जाट सडा पांचसे स्वारानसी आम्हास भेटीस आला. भेटी जाली. मागती त्यास बहुता प्रकारे भर दिल्हा कीं तुम्ही चला, तुम्ही आम्ही मागती जाऊन. त्यानें साफ सांगितले कीं इरानचा पातशाहा पनास हजार फौज घेऊन येऊन हिंदुस्थानची पातशाही घेतली. तेथे येकानी गोली वाजविली नाही. येक मेला नाही. माझी कथा काये? मजला साफ तिकडे येवत नाहीं. तुमचेंच कर्म कीं तुम्हीं येवढे कर्म केले. आमची प्राप्त नाही. व आबदालानेहि आश्विर्य मानिले की वीस हजार फौज मराठे असिले तरी आपल्यात इशनास पाऊ देणार नाहीत. हिंदुस्थानची फौज तरी आबदालीचे फौजेपुढे शभरापुढे पांच हजार पलतात. ठरतां त्याच्या मुकाबले स्वामीचे खानाजाद मात्र पहिलेहि दोन ती वेल व हाली या भारी संग्रामास ठरले त्यास अपूर्वक जाले! हिंदुस्थानास जाले की पातशाही खावंद मराठे खरे! आणीक याची फौज जमा जाली तरी हेच मात्र आबदालीस बुडवितील ऐसा भरवसा पुरला. सुरजमलास आपल्या किल्यात गेला. आगरियापासून दिलीपर्यंत वस्तीहि येक माणूस नाही. हे अवस्था जाली. ते आतां खासा दिलीत आहेत. पुत्र निवड आम्हावरी आली ती पुढे पलवल होडलपरियेत दिलीहून पंचवीस तीस कोसावरो आहेत. सुरजमलास पत्र पाठविले कीं मुलक सोडणे पैका देणे भेटीस येणे चाकरी करणे. त्याजवरून आम्हास सुरजमलान सांगितले कीं मजला भेटता पुरवत नाही, झुंजता पुरवत नाही. वकील पाठऊन जाबसालात पैकियाच्या बोलीचालीत पंधरा रोज गोवितो. लाख दोन लाख दरबारी खर्चहि करितो इतकियात तुमच्या फौजा आल्या तरी मीही चाकरीस हजर व पैका त्यास कवडी देणार नाहीं. तुम्हास पैका देईन. पंधरा दिवसा तुमची फौज न आली तरी मग मामलत करून पैका त्याजला देऊन याचीच चाकरी करून यैसे बोलून किल्यात गेला. आम्ही मात्र मथुरेस आहो. आम्हास त्याचे फौजेसहि आता पंचवीस कोस तफावत आहे. अंतरवेदीत त्याजकडील पाच राऊत उतरले नाहीत.