Selections from the Peshwa Daftar 27.179: [25-5-1759] This is the first long sheet of a letter sent by Sakharam Bapu who had been deputed to adjust the differences between the sons of Jagatraj Bundele and who explains how he is proceeding in the affair. He presents a strong remonstrance to the Peshwa against taking the advice of interested parties.
Selections from the Peshwa Daftar 27.179
- Language
- Marathi
27.179
श्री
सेवेसी विज्ञापना. येथील वर्तमान ता॥ छ. २७ रमजानपावेतो स्वामीचे कृपेकरून सेवकाचे वर्तमान येथास्थित असे विशेष. आज्ञापत्र सादर जाले, तेथें आज्ञा कीं येक पक्ष धरूनच तुम्ही लिहिता. पाहाडसिंगाकडून प्रतापसा वैद्य राजश्री समसेरबाहादर यांचे विद्यमाने बहुतेक प्रकारे बोलतो तर प्रमाण गोष्ट आसेल. नजराण्यांचा येवज मातबर ठरोन रोख ये आणि साहास न लागता सरकारकाम होऊन ये आसे बहुतेक प्रकारे आज्ञा केली. येसियास सेवकाने येकच पक्ष धरून वर्तणूक केली नाही. परंतु प्रकार सरकारच्याच लोकानी द्वेषेकरून अथवा आपला स्वार्थ पाहून कलह वाढविला येविसी प्रारंभींच विनंती पाच सात वेळा लिहिली कीं स्वामीनी ज्याचे स्वाधीन जे कर्म केलें तो त्याचा जिमा. खावंद आज्ञा करितील तेणेप्रमाणे वर्तवि आणि [सेवक खावंदास] विनंती
3683 करील त्याप्रो खावंदानी त्याचे साहित्य करून दुसरें बोलत असतील त्यांचे न येकतां ज्याचे त्याजवरच सोपून पक्षहि धरिला असला तरी तो खावंदांचे आज्ञेव्यतिरिक्त सेवक धरणार नाही आणि आज्ञेने पक्षहि केला तो सोडिल्याने या लोकांत प्रमाणता राहत नाही. या बुंधेलखंडात काही कुवरांस उणे नाही. आम्ही पाहाडसिंगाचा पक्ष सोडून गुमानसिंग खुमानसिंग यांचाच केला नवता. पाहाडसिंग यास जगतराज याने काही दिल्हें नवतें. येक जमलपूर परगणा मात्र दिल्हा होता. याची आई मेली. तिजकडे जागीर होती ते व तिची वस्तभाव सरकारांत राज्याने लाविली. हा मागता बहुत श्रमी जाला. परंतु न दिल्ही. याजला पाच सात लाख रु॥ कर्ज. परंतु यास त्याणे काही ठिकाणा लागों दिल्हा नाही. सर्व देणे आगर ममता या उभयेता कुवरावर जागीर जाजती जागा चांगली पहिल्यापासून यांचा डौल राज्याचा करीत आला. सरकारांत हरिपंत असता * * * चे राज्याचे बोलणे बोलून करारमदार हरिपंती सरकारात नजरेंचा हती समागमे घेऊन गेले; तो हती सरकारात सेवकाने दिल्हा. त्यावर इकडे आलियावर जो जैसा मार होत आला तो तसा सेवेसी लिहीत गेलो. त्यांत काही अंतर केले नाही. प्रस्तुत राजा मेलियावर प्रसंग बहुतच वाढला. याचाही भाव सविस्तर लिहीत गेलो. वारंवार विनंती केली कीं जे ग्रहस्त साहित्य करितात, त्यांचें बोलणे बोलतात. त्यांस ताकीदपत्रें कीं तुम्हा दुसरियाच्या जिम्यात मन घालावयास प्रयोजन काये ? ते मातबर जाले तर त्याणी आपलेच दिल्हे आसे. विनंती लिहिता स्वामीनी त्यास ताकीदपत्रे पाठविली नाहीत. तेथे बोलणे बोलतात त्यासहि ताकीद न जाली. यामुळे त्याणीं इतका प्रकार वाढविला. आम्ही येक पक्ष केला नवता. पाहाडसिंगाकडे त्रिंबकपंत व चिंतामणराव पाठविले कीं राज्याची मालेत तू आटोपून बसला आहेस. त्यास मालेत आनामात राज्याचा पाचाजवळ मोजदाद करून ठेवणे. मातबर पाच तुमच्या राज्यातील आसतील हे आम्ही बसोन तुम्हास सांगू. त्याप्रा॥ येकावे असें सांगितले. बहुत वेळ सांगून पाहिले. तो या ग्रहस्तांच्या चढाने (ऐ)केना. दरोबस्त राज्य माझें मजला राज्यानें दिल्हे होते. * * * * * काही नवते. परंतु लुटून घेतल्याने काही उतम नाही. त्याणेहि सिष्टाईखाले घालून मग साहित्ये बहुतौनी केली. जागा जागा कबुलाती जवाहर हिंदुपतीस व हती दिल्हे. मग तो बलावला. सरकारात रदबदल्या करूं लागले. त्यांची पत्रे येत चाललीं. मग आम्ही हें सोडून राज्याचा मुलुक जप्त केला. पाहाडसिंगाचे जमलपूरहि जप्त केले. तेथेहि साहित्ये ग्रहस्तानी बहुत केली. रुपया येऊ न दिल्हा. गव्हार गर्दी जाली. तशात जप्ती राखून थोडा बहुत वसूल जेथवर हात
3684 पावला तेथवर घेतला. हल्ली जसी जेथे जाली आहे तेथें आहेच. गोपालराव व गोविंदपंत याणी आणीक काही स्वार मदतीस चोरून पाठविले. रांठेंत सेमोणीपिलाणीत ठाणियास उपद्रव करून मदतीस गेले. मागती सेवकाने फौज पाठऊन ठाणे रांठेचे घेतले. सेमोणीपिलाणीकडीलहि गोपाळयांची फौज बुंदेल्याकडील लोकांनी व आम्हाकडील पागा हुसेनखान याणी मिलोन ते फौज लाविली. कांही लुटली गेली. जुज न करिता पलाले. आसा मार आजीपर्यंत जाला. बलाबोल पक्ष पाहून रुपया रोख हातास यावयाचा मार तर जाण्याने व फौजेने मातबर गुमानसिंग खुमानसिंग हे पहिल्यापा जगतराज याणेच केले. सवाई गुमानसिंग हे हिंदुपत आदिकरून सर्वास व सरकारात सनदापत्रा राज्य किरतसिंगास दिल्हे. लिहिली करारमदार पहिलेच जालेले पाठविले. सर्वांनी दाखला * * * हातां राजा असता हेंच प्रमाण म्हणून—