Selections from the Peshwa Daftar 27.180: [17-6-1757] Gangadhar Yashwant makes enquiries about the whereabouts of Raghunathrao.
Selections from the Peshwa Daftar 27.180
- Language
- Marathi
27.180
श्रीमंत राजश्री दादासाहेब
स्वामीचे सेवेसी
श्रीमोरया
विनंती सेवक गंगाधर यशवंत कृतानेक साष्टांग नमस्कार विज्ञापना. येथील क्षेम तागाईत आषाढ शुद्ध १ प्रतिपदा मु॥ कवड्डागंज काळी नदी येथे साहेबाचे प्रतापेंकरून स्वस्तिक्षेम असो विशेष. साहेबाकडून आज्ञापत्र आले त्याजवरून बहुत संतोप जाहाला. तिकडील सविस्तर वर्तमान लिहून पाठवणे म्हणौन आज्ञा. त्यावरून इकडील सविस्तर वर्तमान राजश्री सखारामपंत बापूनी सेवेसी लिहिले आहे त्याजवरून श्रुत होईल. पुढे दरमजल जात आसो. होईल वर्तमान ते सेवेसी लिहून पाठवीत जाऊं. सांप्रत आपला मुकाम कोणे ठिकाणी आहे हे सविस्तर ल्याहावयास आज्ञा करणार स्वामी समर्थ आहेत. शेवेसी श्रुत होये हे विज्ञाति.
Bk Ca 11-24