Pramāṇa · Search · About · API

Selections from the Peshwa Daftar 27.242: [26-1-1760] Jankoji Sindia to the Peshwa saying that the project for the capture of the holy places from the Rohillas and Shuja-ud-daula as desired by the addressee, is being separately communicated.

Selections from the Peshwa Daftar 27.242

Language
Marathi

27.242

छ २२ जाखर सु॥ सितैन

माघ मास

श्री

श्रीमंत राजश्री पंत प्रधान

स्वामीचे सेवेसी

विनंती. सेवक जनकोजी सिंदे कृतानेक दंडवत विज्ञापना. सेवकाचे वर्तमान ता॥ छ ७ जाखर मो॥ कुंजपुरा पर्यंत स्वामीचे कृपावलोकनें करून यथास्तित असें विशेष. सरकारची आज्ञापत्रे छ २ सफरची पाठविलीं तीं छ ५ राखरी सादर जालीं. तेथें आज्ञा, कितेक मनसब्याचा अर्थ रोहिले व सुज्याउद्दौला याजकडून माहाक्षेत्रे घ्यावयाचा विचार व पूर्वेकडील वगैरे अर्थ तपासिलें आज्ञापिलें ते सविस्तर कळलें. ऐसियांस येतद्विशईंचा अर्थ तपसीलवार अलाहिदा पुरवणीपत्री सविस्तर सेवेसी लिहिला असें त्यावरून विदित होईल. सेवेसी श्रुत होये हे विज्ञाप्ति.

3735 २३६