Selections from the Peshwa Daftar 27.241: [9-11-1759 ?] Parashar Dadaji reports to the Peshwa the chastisement of Kushalsing of Ruru.
Selections from the Peshwa Daftar 27.241
- Language
- Marathi
27.241
पैवस्ति छ २१ जमादिलावल
श्री
श्रीमंत राजश्री पंत प्रधान
स्वामीचे सेवेसी
विनंती. सेवक पाराशर दादाजी कृतानेक साष्टांग नमस्कार विज्ञापना. येथील क्षेम तागायत कार्तिक वद्य ५ पंचमी मुकाम पा॥ बोले प्रांत आंतरवेद येथे स्वामीचे कृपावलोकनेंकरून सेवकाचें वर्तमान यथास्थित असे. यानंतर रुरु पा॥ फफुंद प्रां॥ मा॥ येथील कुशलसिंग मवासी जमीदार होता. सरकारी आमल सुदामत देत नव्हता म्हणोन त्याचें पारपत्य करणें हुजसून जरूर होतें; त्यावरून त्याजकडील तालुके व मातबर ठाणीं व पेशजी धुंदीत सरकारचीं ठाणीं त्यांनीं लबाडी करून घेतलीं तीं कुल मोर्चेबंदी करून दोन अडीच महिने मेहनत करून घेतलीं. कुल त्याजकडे गढ्या होत्या त्या फत्ते केल्या. भिंतांडाचें झुंज याजमुळे घोडे माणूस बहुत जायां जाहालें. कुसलासिंग रुरात होता तेथेहि जाऊन त्याजशीं गांठ घातली. तेथें मोर्चेबंदीचें काम न चालें म्हणून घोड्यांवरून तळावे करणें लागलें. अखेरीस येक रोज घोड्यांवरील जुंज मातबर
3734 जाहालें ते समयींहि घोडें माणूस कांहीं ठार जाहालें व जखमी जाहालें; परंतु त्यांस मोडून गांवांत घातलें. निदान त्यांस दम धरवेनासा जाहला; तेव्हां रात्रीच्या ठायीं कुसलसिंग पळोन गेला; याउपर त्याच्या तालुक्याचें काम कांहीं राहिलें नाहीं. आणखीहि कितेक ढोंग आहेत त्यांचें पारपत्य करावें लागतें. स्वामीच्या प्रतापेंकरून त्यांचेंहि पारपत्य होऊन येईल. तदनंतर समजाविशी नालबंदीच्या ऐवजाचे नेमणुकेविषयीं पेशजी विनंतीपत्र लिहिलें होतें; परंतु नेमणूक होऊन सनदपत्र आलीं नाहीं. लोकांनीं तों गवगवा बहुत केला आहे, तरी कृपाळू होऊन राजश्री गोविंदपंतावर समजाविशी नालबंदीची सनद द्यावी. आज्ञा केली पाहिजे. सेवेसी श्रुत होय हे विज्ञापना.