Pramāṇa · Search · About · API

Selections from the Peshwa Daftar 27.244: [1759 ?] Visaji Dadaji orders Ramaji Anant to come at once, in order to prepare to go into camp with the Rao (Vishvasrao).

Selections from the Peshwa Daftar 27.244

Language
Marathi

27.244

श्री

चिरंजीव राजश्री रामाजी अनंत यासी विसाजी दादाजी आसीर्वाद उपरी. तुम्हास येक दोन पत्रे पाठविली की लौकर येणे, त्यास अद्याप आलेस नाही. राजश्री भाऊ बाहेर निघाल्यास आठ रोज जाले. बुधवारी येथून कूच होईल. आमची तयारी काडीइतकी जाली नाही. ब्राम्हण नाही, चाकर नाही, तरी तुम्ही येक ब्राह्मण कोणता मिलेल तो व बांडी चाकर देखील सारी घेऊन लौकर येणे. तीर्थरूप राजश्री केसोपंत दादा व तुम्ही लौकर येणे. विलंब न लावणें. मग लस्कर आटोपतेसे नाही. येंदाची स्वारी जलद आहे. हे आसीर्वाद. माणसे व रामाजी नसला तरी दुसरा तरी ब्राम्हण मेळऊन घेऊन येणे हे असिर्वाद.

3736