Pramāṇa · Search · About · API

Selections from the Peshwa Daftar 27.245: [Recd. 7-1-1760] Dhondo Ram reports to the Peshwa that on the approach of the Abdali the Emperor Alamgir and his advisers were put to the sword and the Vazir with the new puppet Emperor has arrived in Sindia's camp.

Selections from the Peshwa Daftar 27.245

Language
Marathi

27.245

छ १७ जावल

श्री

पुाँ श्रीमंत माहाराज राजश्री पंत

प्रधान स्वामीचे शेवेसी

विज्ञेति यैसीजे. दिलीचे वर्तमान आवरंगाबादेस आले. तेथून साहावे दिसी कासद छ ९ जमादिलावली लस्करात आला. आबदाआली छ ६ रबिलाखरी सरहंदस दाखल जाहाला. छ ९ माहे मजकुरी आलमगीर पातशा व फतेआलीखा व खानखाना व कमरुदीखानाचा थोरला लेक यो चौघे जण मारले गेले. नवा बादशा गाजुदीखा वजिराने तख्तावर बसऊन नवा बादशा व गाजुदीखा उभयेतां जनकोजी सिंदे याचे सैन्यात आले. आबदाआली दक्षेस येणार. त्याजपासी साठ हजार स्वार आहेत. मन्हाट्या फौजेच्याने त्यासी मुकाबला करवतो यैसे नाहीं याप्रमाणे नवाबास आर्ज आली. दुसरे दिवशीं आणिक कासिद आवरंगाबादेहून आला. दरगाकुलीखा व चिमणलाल आकबारनवींस याचे पत्र दिलीच्या वर्तमानाच आले कीं, आबदाआलीने आलमगीर बादशा वगैरे मारिल्याचे वर्तमान यैकोन थानेसरांत आपले लेकास तख्तावर बसविले. त्याचे नांव तैमूरशा ठेविले. मल्लिकजमानी आबदाआलीसमागमे आहे. आबदाआलीची पत्रे रोहिल्यास व माधवसिंग वगैरे यांस आली कीं मन्हाट्यास तंबी करावयास सत्वरीच येतो. थानेसर दिलीहून पलीकडे असी कोस आहे म्हणून; याप्रमाणे वर्तमान आले होते. आलमगीर पातशा वगैरे आबदाआलीच्या फितुरात होते. गाजुदीखानास जख देणार म्हणून गाजुदीखानास उमजल त्याजवरून त्यानेच बातशा वगैरे युक्तीने विल्हेस लाविले म्हणून येथे चर्चा आली. शेवेसी श्रुत होये हे विज्ञप्ति.

[१ पेशव्याचा निजामाच्या दरबारांतील वकील धोंडो राम याचें पत्र.]