Selections from the Peshwa Daftar 27.256: [12-9-1760] Trimbak Sadashiv Purandare writes to Naropant Palande that Delhi has surrendered and negotiations for a treaty have been set on foot with the Abdali, but are not expected to succeed.
Selections from the Peshwa Daftar 27.256
- Language
- Marathi
27.256
श्री
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री
नारोपंत पालंदे स्वामी गोसावी यासी
पोष्य त्रिंबकराऊ सदासिव कृतानेक नमस्कार विनंती उपर. येथील कुशल जाणून स्वकीये कुशल लेखन केले पा॥ विशेष. बहुता दिवसी पत्र पाठविलेत ते पावून बहुत संतोष वाटला. याच प्रकारें सदैव कुशलार्थ लेहून सानंदवीत जाणे. इकडील वर्तमान दिली किल्यासहित श्रीमंतीं घेतली. बंदोबस्त केला. आबदाली फौजसुधा यमुनापार येऊन उतरला आहे. येमुनेस पार्योंब नाहीं. सलुखाचाहि जाबसाल सुज्यातदौला, नजिबखान याजकडून काही आहे. ठहरल विचार तो लेहून पाठऊं. फार करून लडाईच व्हावी असे दिसते. श्रीमंताचे ताले विचित्र आहेत. शत्रूचे पारपत्यच होऊन पराभवातें पावेल. सविस्तर राजश्री बालकोबा व राजश्री बापूजीपंत लिहितील त्याजवरून कळेल राा छ २ सफर मुकाम दिली. बहुत काये लिहिणे लोभ असो दीजे हे विनंती.
[+ सबंध पत्र नाना फडणविसाच्या हातचें असून यापुढील मजकूर खुद भाऊसाहेबांच्या हातचा आहे.]