Selections from the Peshwa Daftar 27.255: [26-6-1760] This is an important letter addressed by Bhausaheb to the Peshwa, describing his financial difficulties as on account of the disturbed condition of the whole of Northern India and the constant presence of the Abdali with his large forces, no regular payments of revenue for the past two years have be
Selections from the Peshwa Daftar 27.255
- Language
- Marathi
27.255
पौ छ १६ जिल्हेज इहिदे
आधिक श्रावण
श्री
शेवेसी विनंती. सन इहिदे शितैनच्या हिंदुस्थान प्रांतांचे मामलेदाराकडे रसदांचा ऐवज येणे. ऐशियास आम्हाकडे ऐवज पाहिजे, यास्तव इकडेंच ऐवज घ्यावा लागतो. मामलेदारास ताकीद होऊन इकडेंच ऐवजाचा भरणा करावयास आज्ञा केली पाहिजे. आबदालीच्या मसलतीमुळे रसदाचा पैका घ्यावा लागला. शहास गुंतल्याने दुसरा पैका कोठे मिळणे कलतच आहे. घरचा पैका व कर्ज खावे लागले. त्यास येकंदर जमेचा व खर्चाचा अजमास करून देशी पैका जमा व्हावा व त्यास खर्च लाऊन तो अजमास व आमचे स्वारीकडील जमेचा व खर्चाचा अजमास करून दोन्ही अजमास पाठविले आहेत. मागील बाक्याचा यैवज देशी व हिंदुप्तान प्रांते येणे आहे. त्यास हिंदुस्तानात आबदालीचा दंगा जाला यामुळे सालमजकूरचा अमल यथास्थित चालोन ऐवज माहालचा वसूल जाला नाही व गारा व तांडी पडली यामुळे जागा जागा माहालास तोटे आले. नवे जुने मामलेतीची घालमेल जाहाली यामुलें बाकीस ठिकाणच नाही. गोविंद बलाल यांजकडील बाकी सालेसाल वोढणीची वोढत आली असे. बहुतच तपशील आहेत. त्याहीमध्यें निकड करावी अगर मागील चौकशी करावी तर गडबडेमुळे चौकशी होत नाही. आबदालीचा पेंच वारल्यावर जे होणे तें होईल. साल मजकूर सन इहिदेचा लहान मोठे मामलेदाराचा रसदेचा व पुढील अखेर साल तागाईत आम्ही आपणाकडे नेमिला आहे. त्यास खर्च फार, जमा थोडकी. त्याहीमध्यें विचार पाहातां केवळ घरचा पैका जामदारखान्यातील खावा असाच प्रसंग प्राप्त जाहाला. त्यास स्वामीचे प्रतापेंकरून पारपत्य पठाणाचे लौकर जाहाल्यास हिंदुस्तानचे माहालचा ऐवज फारसा आम्हाकडे लागणार नाही. स्वारीशिकारीमुलें खंडणीचा ऐवज आकारेल. पठाणाचें पारपत्य जाहालें तरी दसरापर्यंत बाहेरील कोठील पैसा मिळणें कलतच आहे. दिलीकडे आलों. या प्रांतात फौजा नेहमी आहेत त्यामुलें, मुलूक वैराण बहुत जाला. जाटाकडे खंडणीचा पैका येणे. त्यास यासमई जाटास मागतां येत नाहीं. जयनगरवाले याजकडील पैका येणे कलतच आहे. मसलतीमुलें अडचण पडली. त्यास या प्रांतीचे माहालकरी यांजकडील येकंदर भरणा तेथे रसदेचा न घ्यावा. कदाचित कोणी माहालकरी याचा इकडे भरणा करावयाचा सावकार नसेल त्यास सांगोन उजनी इंदूर या ठिकाणच्या हुंड्या घेऊन पाठवाव्या. देसचा जमेचा व खर्चाचा अजमास करून पाठविला आहे व मागील शितैनची माहालकरी यांकडे बाकी राहिली आहे. त्यास हिंदुस्तानाप्रों तिकडील तपशील नाही. फडशे माहालकरी याचे जालियास काही ऐवज वसुलात येईल. सन इहिदेची जमा व खर्च लिहिला आहे. त्यास सरासरी पाहातां खर्च जाऊन बाकीच राहावी असा अजमास आहे. फौजेचे खर्चाचे दोन प्रकार लिहिले आहेत. त्यास मसलत पडल्यास तीस हजार फौज लागेल. नाहीतर काहीच गुंता नाही. अबदालीचा पेच उलगडल्यावर देशी काही मसलत पडणार नाही. पठाणाची मसलत लांबली तर आम्हाकडे खर्च भारी व आपणाकडे खर्च भारी होईल. इकडील स्वारीचे लोकास निजामअलीचे जुंजात घोडी पडली व रोगाने बहुत मेली यास्तव घोडे घ्यावयास थोडें बहुत जरूर द्यावे लागते. शितैनची रवानगी
[१ रसद्, Money paid into the treasury by the कमावीसदार, raised from his district or charge.]
3745 लोकास द्यावयाची त्यास पोटास रोजमरा पुर्ता मिळत नाही तेव्हा खानगी व नालबंदी कोठील? दिलीकडे दंगा जाहाला यामुळे इकडील सावकार परागंदा जाहाले. कर्जवाम कोठे पैसा मिळत नाही. स्वामीच्या प्रतापेकडून पठाणाचें पारपत्य लौकर जाहालें म्हणजे सर्व गोष्टी उतम आहेत. जिकडे कामास जावें तिकडे मेळवावे खावें. रड ल्याहावी उतम नाही. परंतु दतबा पडल्यापासून फार रोज कजिया होऊन बखेड बहुत्त जाले. सलाबत त्यांची वाढली. त्याचे पारपत्य जालें तर दसरापर्यंत ऐवज कोठील मिळणार? कर्जासहि सावकार सर्व जागाजागाचे निघाले. इकडील रसदा इकडे देविल्या तर देशी कर्ज वारून ऐवज अधिक आहे. च्यार यादी होत्या त्यावरून अजमास इकडील व देसचा जमाखर्चाचा बारमाही लिहिला आहे. दाहा वीस लाख आलीकडे पलीकडे जमा कम तर काही कलमाची जाजती होईल. सर्व अर्थ ध्यानांत आणून रसदाचा ऐवज इकडे द्यावयाविशी मामलेदारास ताकीद करावी. येथून पत्रें पाठविली आहेत. यंदाचा मनसबा विलक्षण यास्तव लिहिलें. नाहीतर घरचा पैका खावा तो फार वाईट वाटतो. इलाज नाही. यास्तव सेवेशी लिहिले आहे. येथेहि मामलेदारास ऐवज इकडेच भरणा करावा म्हणून ताकीद केली. पूर्वी याच मजकुराचें पत्र पाठविले आहे, ते पावेल न पावेल यास्तव दुसरियाने विनंती लिहिली असे. राँ छ १२ जिलकाद बहुत काये लिहिणे हे विनंती.