Pramāṇa · Search · About · API

Selections from the Peshwa Daftar 27.82: [11-11-1753] Jayaji Sindia assures Sakharam Bapu that he will join him without delay.

Selections from the Peshwa Daftar 27.82

Language
Marathi

27.82

श्री

राजश्री सखारामपंत गो-

सावी यांसी

[seal: सकलगुणाळंकृत अखंडितलक्ष्मीआलंकृत राजमान्य श्नो जयाजी सिंदे दंडवत विनंती उपर.]

येथील कुशल ता॥ छ १९ मोहरम मुकाम नजीक महंतपूर जाणौन स्वकीय कुशल लेखन करीत गेले पाहिजे विशेष. आम्ही छ १२ मोहरमी उजनीस आलो. आज छ मारीं कूच केले सत्वरीच येतो. उजनीस दोन रोज मुकाम लोकाच्या गवगव्यामुळे जाला. निमे लोकांची समजावीस केली. निमे लोक राहिलेच आहेत. नित्य उठोन खर्चास मागतात. अखेरसाल होऊन गेले त्याची समजावीस केल्यास खो कसे निघतात ? च्यार महिने उजनीस फौज राहिली त्यामुळे छावणीत खर्च भारीच बसला. छावणीमुळे दुसरियाने लोकाची समजावीस करावी लागती. यैशााहि वोढी सोसून स्वामि-सेवेसी येत आहो. सर्वा गोष्टीचा निर्व्हां करणार खावंद समर्थ आहेत. त्याप्रसंगी आपण आहेत. सर्व भरवसा आपला आहे. ज्या मुकामी पत्रे पावती्ल त्याच

३599 मुकामी श्रीमंतास सांगोन मुकाम करवावें. आम्ही आल्यावर दरमजलीने चालावे. कित्येक मजकूर श्रीमंतानी सांगितला आहे तो कागदीपत्रीं लिहिता येत नाही. भेट झाल्यावर समक्ष सांगितला जाईल. मुख्य गोष्ट कीं आम्ही आल्याखाों कूच न करावे. भेटीनंतर दर कूच चालावे. आम्ही दररोज तेरा कोस चौदा कोसाच्या मजली करून जलद येऊन पोचतो. याउपर आमचा गुन्ता कोठेहि नाही. पत्रामोगोमाग आम्ही येतो. बहुत काये लिहिणे? लोभ आसो दिला पाहिजे हे विनंती.

[शिक्का]