Selections from the Peshwa Daftar 27.83: [1753?] The writer reports to the Peshwa the differences that had arisen between the various parties in the Imperial court at Delhi and requests him to send assurances of immediate help to the Emperor. Both the beginning and the end of the letter are mutilated.
Selections from the Peshwa Daftar 27.83
- Language
- Marathi
27.83
(वरील मजकुराचा बंद गहाळ)
नजर केल्या. पातशहा * * * * तुम्ही कदीम खानाजाद अहा. जाटांनी व मनसूरअलीने निमकहरामी केली आहे यासी तंबी करणे. ते वेळेस माधोसिंग राज्यानी उत्तर प्रतिउत्तर न केले. उभयता किल्यात गेलियावर माधोसिंग याणी पातशाहास अर्ज केली की खानाजाद मनसूरअली व जाठ आहेत. तकसीर माफ करावी. हेच भानगड दोन तीन दिवस पडली. पातशाहा ना येकेत; त्यावर राजानी कूच करून तीन च्यार कोस जाऊन राहिले. त्यासी सलुखाचे विचारात कमर्दीखानाचे लेक खानखानाहि आहेत. येक गाजदीखान याचे विचारात नव्हते. त्यासी मनसूरअलीखानानी लिहा की मी तुमचे सेवेसी चुकलो नाही. तुम्हास बक्षिगिरी देविला आनि तुम्ही वोढून धरिता हे तुम्हास उचित नाही. त्यावर यानी (वि)चारिले की सर्व येकत्र जाले आहेत. म्या येकल्याने वोढून धर्लियाने काये होते? त्यानीहि होयास होये मेलविली; परंतु अंतकर्णापासून सला करावा येसे नाही, येणेप्रा पातशाहानि नाइलाज जाणोन जो जे म्हणतो ते कबूल करितो. आश्रय यास कोणचाहि नाही. स्वामीचा मार्गप्रतीक्षा चातकन्याये लक्षितात. अनि गुसाऊ माणूस दरम्यान आहेत त्यासी सांगोन आमचे वर्तमान आणवितो की पत्राची उत्तरे आली की नाही, येसा वेध स्वामीचा पातशाहास लागला आहे. आमच्या पहिल्या विप्राचाहि भरोसा
3600 येत नाही. मंटेचे चाक आहे, दोन्ही हाते जेवणार, सबब धीर पुरत नाही. सारांश गोष्ट हेच आहे की आपण येथे आलियावर याचे समाधान आहे. दोन्ही पदे पहिली ल्हीा आहेत ते प्राप्त होत्ऱ्यात. आपण येथे आलियावर पातशाहास आणून भेट करऊन उभयेथा येकांती बसून शेपत्तप्रमाण करविले जाईल. उभयेपक्षी चित्तात कोणेहि गोष्टीचा वसवास न राहे येसे करावे लागते. आपण कोणते मार्गे येणार ते पत्री ल्हीा पाहिजे. निमित्यें की पातशाहाचे येक दोन भले माणूस व त्याचा हात्रोखा घेऊन पुढे येऊन सर्व वर्तमान निवेदन करून स्वामचेि आज्ञेप्रमाणे कार्ये करावे येसा विचार आहे, हे गोष्ट आपण कोणास श्रुत न करावी. जे आपले हाते जेऊ सिकले आहेत त्यास उत्तम वाटणार नाही. त्रिवर्गास हे गोष्ट पथ्यात न पडे बद्दल विनंती ल्हीा असे. जोपरियंत गोष्ट अमलात ये तोपावेतो गुप्त असू दिधली पाहिजे. येथेहि आपण कोणास श्रुत होऊ देत नाही. येक मुख्ये व त्याची मातुश्री येक दोन जिव्हाल्याचे माणस पातशाहाकडील याखेरीज कोणास विदित नाही. आपणहि येकांती पत्रे वाचून जवळ ठेवावी. पहिले पत्री विनंती लिहिली आहे. येणेप्रमाणे अर्जिया दोन उभयतास पाठवाव्या की आम्ही सिताब येऊन पोहोचतो आणि हजरतचे हुकमाप्रमाणे नौकरी बज्याऊन आणून सला एकंदर न करणे. दगा होऊ सकेल याकरीता मोहरमचा महिना अशूऱ्याचा आहे या बाहाण्याने दिवस काढणे. अखेर मोहरम येऊन पोहोचतो. हजरतचे कदमपोसी करितो. पहिल्या पत्रावरून दोन्ही अर्जिया लिहिल्या असतील तर येऊन पोहोचतील. हाली या पत्राचे उत्तर पाठवावे ते सनई हिंदवी अर्जी स्वदस्तुरे लेहावी की आम्ही खानाजाद हजरतचे पदरी असतां फिकीर न करणे. हिंदुस्तानचे लोक निमकहराम जाले, परंतु आम्ही दक्षेणी इमानास खता करणार नाही. येसे समाधानचे पत्र स्वहस्ते ल्हीा पाहिजे. मी वाचून येकांती अर्थ सांगोन धीर पुरवीन. मीरमनूस जयेनगरीहून माझे नावे पत्र ल्हीा होते, त्याचे उत्तर आले आहे. ते बजिनस सेवेसी पाठविले आहे. त्याचा अर्थ वाचून विदित होईल तो विचार तो राहिला आहे. थैल्या मजपासी आहेत. विशेस येक पत्र चुडामण जाट याचे पुत्र जुलकरण वडील व दुसरा मोहकुमसिंग या दोहीचे नावे येक पत्र लेहावे की आम्ही त्या जिल्यात आलियावर तुम्ही भेटीस येणे. तुमचे मुदे हसल केले जातील. दुसरे पत्र कामयाबखान सेकावटीचा आहे त्यासहि येणे प्राा ल्हीा की तुम्हीहि फौजसुधा येऊन मुलाजमत करणे. तुमचे मतालव हसल केले जातील. हेहि दोन पत्रे पाठविली पाहिजेत. आम्ही पुढे भेटीस येऊन ते वेलेस बरोबर घेऊन येऊन. त्याकडे जे नजर मोखरा करणे ते रुबरू करऊन याचे काम याचे हाते करविले जाईल. स्वामीचे सलाबतीने होणे ते होईल, आपण वरात राजश्री बापूजी महादेव याजकडे रु॥ पनास हजार खरेदीस देविले ते देत नाहीत. तेथे आपणाजवळ रो। दामाजी माहादेव आहेत त्यासी ताकीद करून ते आपले * * * स लेहावयाचे ते लिहितील. येवज अ * * स्वामिकडे पाठवावा अगर जे * * * * (अपूर्ण).
Linked texts (1)
- Fall of the Mughal Empire — Jadunath Sarkar, English