Pramāṇa · Search · About · API

Selections from the Peshwa Daftar 27.89: [Recd. 19-8-1754?] The writer reports to the Peshwa the efforts that were being made to extract money from Delhi through the instrumentality of Nagarmal who was presented to Dadasaheb.

Selections from the Peshwa Daftar 27.89

Language
Marathi

27.89

छ २९ सवाल

श्रीवरद

पु॥ श्रीमंत राजश्री पंतप्रधान स्वामींचे सेवा

विनंती विज्ञापना ऐसी जे. नागरमलासारिखा मुतसदी काबिल पोख्त कारखाने पूर माकुल तजविज सांगणार त्यासी कोणाचे सांगितल्यावरून आला. बा महमूदामारिखा लेखा करावा, हे मानस वजिराचें देखोन नागरमल उठोन आमचे घरास जंत्रींत येऊन बसला. मातबर माणूस, सर्व पातशाही ज्यांचे येख्तियारांत, तमाम फिरलो जात * * * जु हे जाणोन श्रीमंत राजश्री दादासाहेबास

३604 विनंती करून त्यासी येथेच ठेविलें. श्रीमंतांचें आंग नागरमलाकडे जाणोन वजिरानीहि मृदुता धरून जेणेकरून कार्यसिध्द होऊन पैसा वसुलात ये तेंच करावें हें संमत दिल्हे. तेव्हां तमाम मुतसदी रुजू होऊन दप्तरचे दाखल्यानसी बाकी साकी निवडून राजश्री गंगाधर यशवंत यांचे विद्यमानें लोकांवरी चिठ्या केल्या आहेत. कोण्ही कोण्ही रूज जाले. त्याचें वृत मनांस आणून जिवन-माफीक वाट निघते. नागरमलाचे आल्याने कांहींसी वाट दिसोन आली, कीं रुपया नजरेस पडेल. येन्हवीं बखे्डाच होता. येथून रुपये हातास यावयास दिसगत लागेल. जलदीने काम होणार नाही. वजिर चितापासून काम करून जलदीने रुपये देतो यैसे दिसत नाही. श्रीमंताचा व मल्हारबाचा तो आग्रहच की चालीस पावेतो नगद घ्यावे. पाहावे महिन्यांत पंचेविस पावेतो तरतूद होईलसे दिसतें. सेवेसी श्रुत होय हे विज्ञापना.

Discussed in (1)