Selections from the Peshwa Daftar 27.90: [Recd. 11-11-1754] The writer laments that the revolutionary changes at the capital have failed to produce the results expected of them. Only a negligible part of the tribute, agreed to by the new Vazir, has been received, and the city is being made to suffer all sorts of atrocities for the levy.
Selections from the Peshwa Daftar 27.90
- Language
- Marathi
27.90
छ २५ मोहरम
श्रीशंकर
पु॥ श्रीमंत राजश्री पंत प्रधान स्वामीचे सोा
विज्ञापना ऐसी जे, आज्ञापत्रीं आज्ञा कीं पैका पुर्ता मिळे फौज फिटून कर्ज वारावयास पनास पाऊण करोड रोकड येई तो अर्थ करून दाखवणे. जे जे पांचपेच असतील ते सर्व चिरंजीवजीचे मर्जीमाफीक ठीक करून चाकरीचा मजरा करणे म्हणून आज्ञा. येसियास लक्षावधि कोट्यावधि धने प्राप्त (हो)णे हे सर्व स्वामीचाच प्रारब्धयोग आहे. आम्ही चाकरलोक * * आमच्या तर्तुदीने काय होणार ? तथापि चाकरीस (सेवक) चुकतहि नाही व पुढेहि * * यंदाचे मुहूर्ताचाच गूण की प्रथमता मसलत ठीक न जाली. तसीच जाटाची मामिलत खातरख्या (ब)नून न आली. उलटी त्यासच काही देश अधिक प्राप्त जाला. पातशाहास गारत केले. त्यासमईहि सरकारच्या फौजा पु * नव्हत्या. लुटेन्यानीच लूट लाबाड केली ते इकडे तिकडेच गेली. तिचे ठिकाण काही न लागले. हती आणून दिधले ते मात्र सरकारात आले. दिलीस आल्यावर गाजुदीखानाचा पुत्रास वजीर केले.
3605
Bk Ca 11-14 पातशाह नवा केला. वजिरानी पंचवीस लक्ष रु॥ वजीरीचे देऊं केले होते. श्रीमंत दादासाहेबाची व रो॥ मल्हारजी होळकर याची मरजी कीं, कांहीं उतमसा ठैराव करावा, तेव्हां नाना प्रकारचा तोडजोड करून महत्प्रयत्ने स्वामिकार्य करून दाखवावें म्हणून साडेब्यासी लक्ष मुकरर केले. त्यात चाळीस लक्ष यंदा द्यावे व साडेबेताळीस पुढें या प्रकारचा तह ठैरला. त्यास चाळसाचे वसुलाचा निकाल करून घेतां आठ नव तों पदरीं पडले व साडेसतराची निशां जाली. टिपा आहेत त्या वायदेसीर वसूल होतील. सा * * * रा निखालस चालसांत बाकी राहिली आहे त्याचा तागादा वजिरासी नित्यानी करितो. पातशाहच्या घरांत पैसा नाहीं. वजिरापासी पैसा नाही. सिपाही उपासी मरतात. नित्य सुरी कटारीसी गांठ. त्याजमध्यें आम्ही तागादा करितों. नगद रु॥ मिळेना. जवाहिर मिळेना. निदान वजीर म्हणतो की (दि)ल्लीच्या आसपास आमच्या व पातशाहाच्या पोट भरा(या)च्या जागीरा आहेत त्याजवर साडेतेराची तनखा घ्या. (दोन ओळी फाटल्या) यांत व पूर्व वर्तणुकेत व वचनातही * * * * * ले आहे. त्याचे लोक शहरांत फार उपद्रव करितात व त्यानेंहि शहरांत पटी मांडली आहे. शहर लुटते. शहरांत प्रलये आहे. याकरतां श्रीमंत दादासाहेबांचे व रो॥ सुभेदाराचे चित त्याजपासून विटले आहे. खानखानाकडे कांहीं या दिवसांत संदर्भ लागला आहे. जर त्याजकडील पैक्याटक्याची निशा दृष्टीस पडली तर वजीरीवर त्यास उभे करावे यैसी उभयेतांची मरजी आहे. जे होता होईल तें विनंती करूं. सेवेसी श्रुत होंये. बहुत काये लिहिणे ? कृपा केली पाहिजे हे विनंती.
Discussed in (1)
- Fall of the Mughal Empire — Sarkar 1932, English