Selections from the Peshwa Daftar 27.94: [1754] The writer reports an encounter between Vithal Shivdeo and the Jats.
Selections from the Peshwa Daftar 27.94
- Language
- Marathi
27.94
[seal: श्री]
साहेबाचे सेवेसी विज्ञापना येसी जे. राजश्री विठ्ठलराव तात्याकडील जमाव मोर्चाजवळ पोख्ता जालियावरी जाटाची फौज सरोन गावात गेली. युध्य प्रसंग पेसजी जाला, ते वर्तमान सविस्तर लिहिले आहे त्याजवरून विदित जाले असेल. राजश्री तात्याकडील घोडी दोन ठार जाली व मोर्चायचे चौकीत राजश्री गणेशपंत याची घोडी येक तोफच्या गोलियाने ठार जाली. साहेबाचे सेवेसी वर्तमान कळावे. राजश्री हर गोविंद मोर्च्यात आले होते. तेथे राजश्री तात्यानी युक्तीच्या वाटेन च्यार गोष्टी दबाऊन बोलिले आहेत. परंतु हे नष्ट आहेत याचा काही विचार सुधा दिसत नाही. आम्ही आज्ञेप्रमाणे चौकसी करावयाची ते करीत आहे. राजश्री हर गोविंद यासी तात्यानी बहुत हेडसफेडस केली. आपला मोर्चा घेऊन जाणे असे पस्ट सांगितले, त्याजवरून बहुत नरम जाले. परंतु ते नष्ट त्याचा इतबार नाही. सेवेसी कळावे हे विज्ञाप्ति.