Pramāṇa · Search · About · API

Selections from the Peshwa Daftar 27.93: [1754 ?] Antaji Mankeshwar's letter probably to Sakharam Bapu dwelling on his difficulties in the district of Faizpur.

Selections from the Peshwa Daftar 27.93

Language
Marathi

27.93

श्री

सेवेसी विनंती उपरी. काली शनवारी पाऊस उघडताच कूच केले. आजि शनवारी रा। विठ्ठलराऊ व आम्ही मिलोन पुढे गेलो. येसियास फैजपूर परगणीयाची तालुका रोहिलियाबा आम्हाकडे आहे हे विनंती पूर्वीच केली. त्यापैकी तीन ठाणे तालुकियात आहे. दोन आम्ही खाली करून ठाणी आपली बसविले. येक हरणपूरचे ठाणे खाली जाले नाही. सुरजमलाकडील परगणा जवळ आहे. त्याजकडील घासीराम रजपूत येऊन सिरला आहे. दावीस खेडी बदली आहेत. आम्ही हेहि खाली करितो परंतु पुढे गेलो. तोफा असल्या तरी चार गोले लावताच पलते. तरी चिरंजीव गोमाजी बहिरव विनंती करितील त्यास हरणपुरी स्वामीनी मुकाम करून तोफाचे च्यार गोले मारतातच चौ घटिकात मोकले होईल. गुंता पडावयाचा नाही. आनमान सहसा न करावा व मार्गी खेडी लागतील ती फार करून लुटली पुढे वस्ती होणार नाही तरी कृपा करून रखवाली करावी. रुपराम कटारे त्याचा पक्ष करितील तरी न यैकावा. आम्हास मामलत करा म्हणतात परंतु दाहवा हिसा देणार नाहीते. साल गुदस्त लबाडी यैसीच करून काही कवडी दिल्ही नाही. नाही तर रूपरामाची सर्वथा गोष्ठी न यैकावी. विनती उदास न करावी. रा। गंगाधरपंत तात्या गंगास्नानास आले. तेथे कोणी

३608 फौजपूरचे खेडियाच्या जमिदारास तात्यानी सांगितले की, आमच्या हिशाचे गाव आम्ही निराळे ठाणे घालू येसा फितूर करून सांगितले. आपण तात्यास विनंती करावी की, पूर्वी सालगुदस्ता आयाजीपंतtargetानी हे साधले याचा लोभ आपण न करावा. आधीच मुलक मात्रागमनी, त्यात फितूर असिलिया कामाचा नाही. तथापि आपणास जरूर यातहि त्यास हिसा देणेच तरी मग त्याचे च्यार रुपये ठराऊ देतील ते देऊत; परंतु शंभर फितूर कामाचे नाहींत हे रा॥ तात्यास न कळता आपण त्यास सांगावे. अनमान न करावा. बहुत काय लिहिणे हे विज्ञापना.