Pramāṇa · Search · About · API

Selections from the Peshwa Daftar 27.97: [1754 ?] This is the last sheet of a long letter in the handwriting of Vithal Shivdev who frankly expresses his views on the conquest of Delhi and discusses the pros and cons of the undertaking. The letter seems to be addressed to Raghunathrao and expresses clearly the prevailing aspirations of the Marathas

Selections from the Peshwa Daftar 27.97

Language
Marathi

27.97

व श्रीचाहि पेंच वारतें उत्तम गोष्टी आहे. लक्ष प्रकारे करावे. यानंतरी यासी दोन गोष्टी प्रतिबाधक. येक तर हे जेव्हां पूर्वेस जातील तेव्हां मोगलाईत सलाबत नाहीं, आपण आपला वक्रहि तेथें राहात नाहीं, हें परिछिन्न आहे. दुसरी गोष्ट पातशाहीमधें दोन सुभे. यैवजी करोडीची गुजराथ, दो करोडीची पुरब, दोन्ही गेलें तेहि निखालस त्यांसी कटकट नाहीं. तोंडीं आम्ही जुझावें, भांडावें; त्याणी सुखरूप पैका मेळवावा. आतां येकच समसाबाद करोडी रुपयांची जागा. वीस पंचवीस लाख तों सहजांत त्यासी येतील. या दोन्ही गोष्टी आहेत. परंतु याचा विचार कैसा आहे कीं, त्यांनीं म्हटलें कीं प्रयाग पटणें बगेलखंड द्या तरी आम्हास देवत नाहीं, तेव्हां अ(व)घेंच कोण देऊं पाहातों ? दूधहि पिईन आणि दहींही वर पिईन म्हटल्यानें दोन कैसीं होतात. यास्तव थोर गोष्टी आपल्या राज्यांतील पेंच वारतो आणि दिवाण रुजू वांटणी होते तें करून घ्यावी. मोगलाईचा कारभार तरी दिलींत प्रस्तुत काय ताल आहे ? बुंधेलखंड, अंतरवेद, प्रयाग, पटणें, बगेलखंड याचा बंदोबस्त जाहाला तरी पोटापुरतें ईश्वर देईल. पुढील पुढें पाहतच आहों. पैक्याची निशा करून घ्यावी, आणि वोढून जेथवर साधेल तेथवर पैका लाखांवरी साधावा, हाच विचार उत्तम दृष्टोत्पत्तिनें दिसतो; यांत स्वामी सर्वज्ञ आहेत. उत्तम दिसेल तें प्रसंगोचित करतील. सेवेसी श्रुत होंये हे विज्ञाप्ति.