Selections from the Peshwa Daftar 29.1: [7-2-1761] Satvoji Jadhav writes to Nana Fadnis agreeing to escort him back to the Deccan after the disaster at Panipat.
Selections from the Peshwa Daftar 29.1
- Language
- Marathi
29.1
श्री
राजश्री बाळाजी पंत नाना फडनीस
गोसावी यांसी
[seal: अखंडितलक्ष्मीआलंकृत राजमान्य स्नो सटवोजी जाधवराव दंडवत]
विनंती. येथील कुशल जाणून स्वकीये लेखन करीत गेले पाहिजे विशेष. आपण पत्र पाठविलें तें पावून परम समाधान जालें. सोबतीनें जावयाचा मजकूर लिहिला तरी बहुत उत्तम आहे. आमची ठाणीं परगण्यांतील कायम आहेत. आम्ही बिदा व्हावयास ठाकूर सुरजमलजी याजकडे येऊं तेव्हां तुम्ही आम्ही समागमेच येऊन सोबतीनेंच परगण्यात जाऊन. चिंता नाहीं. सर्व गोष्टी आपले घरच्या आहेत. दुसरा अर्थ नाहीं. कळलें पाहिजे. रा छ ३० माहे जमादिलाखर. बहुत काय लिहिणे ? लोभ असो दीजे हे विनंती.