Pramāṇa · Search · About · API

Selections from the Peshwa Daftar 29.2: [5-6-1761] Gundo Kashi to Dadasaheb regarding Chintoba's letter to Nimbabai to the effect that Jankoji Sindia is at Malkapur. He also mentions the letter of Nanasaheb to Balvantrao Shenvi regarding the deposit of the money of Ramchandra Baba with one Gopal Shankar.

Selections from the Peshwa Daftar 29.2

Language
Marathi

29.2

श्री

श्रीमंत माहाराज राजश्री दादासाहेब स्वामीचे

सेवेसी

विनंती सेवक आज्ञाधारक गुंडो कासी मु॥ श्रीगोंदे चरणावर मस्तक ठेऊन सिर सां नमस्कार विज्ञाति. येथील वर्तमान ता॥ छ १ माहे जिल्कादपावेतो साहेबाच्या कृपावलोकणेकरून यथास्थित असे विशष. येथील वर्तमान यसजे. छ २८ माहे शवाल तिसरा प्रहरा राजश्री चिंतोबा दि॥ जनकोजी सिंदे याचें पत्र निंबाबाई सिंदे याजला आलें. मथुरेचें मुकामचें पत्र होतें. त्यांत मजकूर येसा जे, राजश्री जनकोजी सिंदे मलकापूर प्रांत जाटाचा तेथे आहेत म्हनोन वार्ता आहे, येसे पत्र आलें. छ २९ माहे शवाल टोकियाहून श्रीमंत राजश्री नानासाहेब याचे पत्र बलवंतराव गोपाल सेनवाई याजला आले. हुजूर बोलाविले आहे, सबब जे राजश्री रामचंद्रबाबा सेनवाई याची ठेव सात लक्ष रुपये गोपाल शंकर याजकडे होतें, त्यासी गोपाल शंकर याणी सिंदियाचा आश्रये करून राहिले यास्तव त्या गोस्टी राहिल्या होत्या. सांप्रत्ये सदाशिव रामचंद्र यानी पेसजीचे पैसुन्यें

Ca 78-1 काहाडून श्रीमंतास विनंती करून बळवंतराव गोपाल याजला हुजूरचे पत्र पाठऊन आनविलें आहे; व श्रीगोंदे येथीलहि मामलेतीचा काही जौबसाल मारनिलेकडे आहै; यास्तव बोलाविले आहे. सेवेसी श्रुत्ये होय हे विज्ञापना.