Pramāṇa · Search · About · API

Selections from the Peshwa Daftar 29.101: [17-12-1765 ?] Naro Ballal reports to Dadasaheb the administration of Nemawar newly taken over from Holkar and Sindia.

Selections from the Peshwa Daftar 29.101

Language
Marathi

29.101

श्री

श्रीमंत राजश्री दादासाहेब स्वामीचे सेवेसी.

विनंती सेवक नारो बलाल मुसकुटे कृतानेक साष्टांग नमस्कार विज्ञापना. येथील कुशल तागाईत छ ४ माहे रजत्रपावेतो स्वामीचे प्रतापेंकरून सेवकाचे व प्रांत मजकुरचे वर्तमान यथास्थित असे विशेष. स्वामीची आज्ञापत्रे आली त्यात आज्ञा की प्रगणे नेमावर येथील बंदोबस्त करणे आणि वस्तीहि करणे व होळकराकडे निमे तरफ आहे त्याचीहि जफ्ती करणे म्हणून आज्ञा. त्यास आज्ञेप्रमाणे प्रगणेमजकुरची होलकराचे तर्फेची जप्ती केली. सरकारतर्फेची लावणी आवादीचे डौल केले आहे. दाहावीस गाव नवे अबाद होतील, होळकराचे तर्फेचीहि अबादीचा डौल करितो. होळकर याचे तर्फेची जमा तूर्त सवा दोन अडीच हजाराचा आकार आहे. सरकारतर्फेचाहि बामेपाणी तपा मिळून पाच हजार पावेतो होईल येसा प्रकार आहे. प्रगणा बहुत चांगला आहे. पिकांस उतम येसा प्रांत आहे. परंतु चोरामुळे वस्ती होऊ पावत नाही. चोराचे पारपत्य सिबंदी वेगले होत नाही. सिबंदीची नेमणूक पहिली सिंद्याकडील तर्फ सरकारात घेतली ते समई पनास प्याद्याची करून दिल्ही होती. अतां दोन तर्फा जाहल्या. याचा बंदोबस्त पनास माणसानी होत नाहीं. इतकी माणसे तो कसबेयाचे ठाणे आणि जकातीचे नाके यावरी व तहसिलेस प्रगणातील लागतात. ठाणेबंदीस लोक राहात नाहींत. तस्कराचा तो बंदोबस्त ठाणेबंदी करून पारपत्य केल्याविना अबादी होत नाही. रयेत वसवास चोराचा खाते यास्तव सिबंदी पाहिजे. त्याची व ठाणेबंदीची यादी आलाहिदा पाठविली आहे. याप्रमाणे सिबंदी असल्याविना चोराचे पारपत्य होऊन लावणीचे डौल होत नाहीं. सांप्रत्य चोरानी उपद्रव मांडिला अहि. मौजे बासद्या पाा मजकूर येथील पाटील यासी धरून नेला आहे. यास्तव याप्रमाणे ठाणेबंदी करून बंदोबस्त करीतो. याची आज्ञा पाठविणार स्वामी समर्थ आहेत. तपे पाणीकाटा फो ड हा त पा सिंद्याचे तर्फेत होता. परंतु सिंद्यानी, प्रगणे उचोद हा माहाल त्याकडे मालव्यातील घाटावर आहे, तिकडे वसुलास संनिध म्हणोन लाविला होता येविसी पूर्वी विनंतीपत्रे सेवेसी लिहिली होतीं त्यावरून तेथील जमीदारास आज्ञापत्र सादर जाहाले त्याजवरून तेथे आमल बसविला. हाली सिंद्याकडील कमाविसदार उचोदास नवे आले. त्याणी राजश्री माहादजी सिंदे याच्या संदा आणिल्या आहेत आणि तपे मजकुरी माणसे पाठऊन खटखट करीतात सरकारचे सनदेस मानीत नाही यामुळे रयेतीस बेरजा वाटतो. तेणेकरून वस्ती कैसी होती? यास्तव विनंतीपत्र लिहिले आहे. तरी येविसी सिंद्यास ताकीद होऊन त्याचे कमावीसदारास पत्र त्याचे येसे कीं तुम्ही तपे पाणियाची दखलगिरी न करणे. सरकारचे तर्फेने नारो वलाल अमल करितील त्यासी करूं देणे. येसे पत्र त्याचे आल्याविना खटखट मिटत नाहीं व जमीदारास पत्र येसे कीं तपे मजकूरचा अमल सरकारचे तर्फेने नारो वलाल यासी सांगितला असे. त्यास तुम्ही रुजू राहून कामकाज मारनिल्हेचे विद्यमाने करीत जाणे. सिंद्याचे कमावीसदाराकडे येकंदर न जाणे. गेलिया मुलाजा होणार नाहीं येसे पष्ट समजोन सरकारचे अमलदारास रुजु राहणे येसे सरकारचे आज्ञापत्र येकूण दोन पत्र पाहिजे. याची आज्ञा करणार धनी समर्थ आंहेत. सेवेसी श्रुत होय हे विज्ञाति.