Pramāṇa · Search · About · API

Selections from the Peshwa Daftar 29.100: [14-11-1765] Malharji Holkar requests Dadasaheb to entertain in his service Vishwasrao Ganesh, son of Ganesh Sambhaji.

Selections from the Peshwa Daftar 29.100

Language
Marathi

29.100

पौ छ ३ रजब सु॥ सीत

* * पौष्य

श्री मोरया

श्रीमंत राजश्री दादासाहेब स्वामींचे सेवेशी

विनंती सेवक मलारजी होळकर कृतानेक विज्ञापना येथील क्षेम तागाईत मार्गश्वर शुध १ प्रतिपदा जाणून साहेबाचे कृपादृष्टिकेरून यथास्थित असो विशेष. राजश्री गणेश संभाजी या प्रांती सरकारतर्फेने होते. त्याउपरी नानाप्रकारे प्रसंग पडले. सेवट दुंडीमुळे केवल खराबीत आले. आम्ही ये प्रांती आलियावरी येऊन भेटले. त्याचा पुत्र राजश्री विस्वासराव गणेश देशास आले आहेत. ते साहेबाचे दर्शनास येतील. त्याचा गौर करणार स्वामी समर्थ आहेत. सेवेसी श्रुत होये हे विज्ञाति.

[१ बुजरग = मोठे, थोर.]

Ca 73-13