Selections from the Peshwa Daftar 29.108: [End of 1765] The letter reports that Raghunathrao who has started north, has been asked to press onward with all possible speed, as hostilities have broken out with the Jats.
Selections from the Peshwa Daftar 29.108
- Language
- Marathi
29.108
श्री
सेवेसी विनंती विशेष इकडील वर्तमान तर श्रीमंत वराणपुराहून कूच करून हांडियाचे घाटावर नर्मदातीरी आले. मकडाईचे ठाणे हस्तगत केले होते. फिरोन काळीभीत मकडाईवाल्याची व निमे मुलूक ऐसे सरकारात घेऊन मकडाईचे ठाणे फिरोन त्यांचे त्यास दिल्हे व जुगराज म्हणोन नर्मदेतच ठाणे चिरेबंदी चांगले मजबूत भिलांकडे होते ते घेऊन सरकारांत ठेविले. राजश्री माहादजी सिंदे याणी नर्मदातीरी भेटी यावे ते आले नाही. राजश्री नारोशंकर याणी पांचलक्ष रुपयाचा भरणा सरकारांत केला. तो ऐवज त्यास द्यावा तो दिल्हा नाही. नारोशंकर येथे करारमदार करून गेले त्याप्रमाणे माहादजी सिंदे यानी चालावे तेहि जाहाले नाही. त्यावरून सिंद्याचे मुलकाची जप्ती करावयास राजश्री खंडेराव बल्लाळ याजबराबर पांच हजार फौज देऊन रवानगी केली, तों मल्हारजी होळकर यांचे पत्र आले कीं इकडे मोठी मोठी कामे करावयाचीं आहेत, लहानसाहान कामासाठीं गुंतो पडतां तर न पडावे. जवाहरमल जाट याणे मल्हारवासी लबाडी केली. त्याचे पारिपत्य करणे जरूर. अनयासे माधवसिंगाचा त्याचा बिघाड होता. लढाई परस्परे जाहाली. जाटाची फौज मोडिली. त्यावरून यांसहि थोडेसे बळ फावले. त्यास महादजी सिंदे व मालजी होळकर यांस पुढे फौज देऊन जाटावर पाठवावे लागतात. भेटीस नर्मदातीरी पाठवावे तरी इकडील मोठे मसलतीची कामे बुडतात. स्वामहि जवळ आल्याने जसी मर्जी असेल त्याप्रमाणे भेटतील. स्वामीबराबर मातबर फौज तोफखाना याचा खर्च असेल याजकरितां येथेहि खर्चाची निकडच. परंतु सावकाराची मेनोती करून कर्ज तीन लक्ष रुपये घेऊन सिरोंजेस भरणा करविला आहे. तेथे स्वार पाठवून घ्यावे. आणखी उदेपूरवाल्याकडून पांच लक्ष रुपये देविले आहेत तेहि लवकरच प्रविष्ट होतील. त्यावरून मर्जी थोडीसी फिरली. राजश्री विष्णु महादेव व सदासिव गंगाधर व सर्व कारभारी याणी अर्ज करून तूर्त जप्ती राहविली (अपूर्ण)
[१ रोख पैसे देतांना केलेली कपात.]