Selections from the Peshwa Daftar 29.107: [1765 ?] This news-letter describes the situation in Northern India giving movements of various powers—the English, Jats, Rajputs, Sindia, Holkar, and Khanaji Jadhav. It also refers to a skirmish in which one Charassing lost his life.
Selections from the Peshwa Daftar 29.107
- Language
- Marathi
29.107
श्री
[ पहिले दोन बंद गहाळ. ]
पुरवनी साहेबाचे शेवेसी.
पातशाहकडील वर्तमान तरी पातशाह अलीगोहर कुन्यानजीक घाटपूर तथ मुकाम करून आहेत. फिरंगी पाच हजार बराबर आहेत. आनखी फिरंगी येणार त्याची मार्गप्रतीक्षा करितात. नवाब सुज्यायदउले आपल्या सुभ्यात लखणऊस आहेत त्याचा यावयाचा विचार काही नाही. मातबर सरंजामाशिवाय पुढे कैसे यावे याजकरितां तेथ मुकाम करून आहेत. राजश्री सुभेदार साहेब यासी पेगाम आहे तो आहे. जाबसाल मात्र आहे. फिरंगी सामील जालियावरी पुढे (कू)च करावे हा विचार मात्र आहे. आहमदखान बंगस आपल्या जागाच आहे. सुभेदारासी घरो(बा) बहुत आहे. राजे माधोसिंगजी यासीहि घरोबा बहुत आहे. कागदीपत्री मात्र वरकड प्रसंगी आनकूल येकासी येक हा विचार घडत नाही. वरकड मारवाड प्रांताचा विचार तरी राजे विजेमिंगजी आपल्या जागाच आहे. राजश्री खानाजी जाधव यानी नाव गाव मातबर होता तो मारला. पुढे धूम आरंभिली आहे. पाच सात हजार फौज जमा केली आहे. आजमेर राजश्री गोविंद कृष्ण याचे हवाला केली. त्याचा बंदोबस्त जाला आहे. मारवाडची मामलीत निकालात आली नाही. खानाजी जाधव पुढे सिरले आहेत. पुढे काये बंदोबस्त होईल ते लिहीत असो. येथील माम- लितीचा विचार तरी हालाकिस्त केली होती त्याप्रा रोख तनखा हुंड्या दिल्हा त्याचा निकाल करून देत आहे. ताकीद दिवान मुसदी यासी बहुत जाली आहे. राजश्री सुभेदारांनी साहित्य केले त्याजवरून विशेष ममता संपादून घ्यावी, कारभार विल्हे लाऊन द्यावा हा विचार आहे. साहेबांचाहि दबाव बहुत पडला आहे. राजश्री माहादजी सिंदे पाटीलबाबा यानी बाकीचा तगादा लाविला त्याजवरून त्याच्या येवजाची हुंडी पाठविली आहे. त्याचाहि येवज निकाल करून द्यावयाची तरतूद लागली आहे. मुख्य सलुखे वर्तावे हा विचार आहे. दीर्घसूत्री कारभार. होऊन येईल ते खरे * * * * * सीद होते चरतसिंग अटक * * * जाऊन. त्यानी धूम केली तेथ * * * लढाई उत्तम घेतली चरतसिंग कामास आला. हे वर्तमान आजी दरबारी यैकिले ते लिहिले आहे. सविस्तर पके वर्तमान तिकडील ध्यानास आलिया साहेबांचे शेवेसी लिहीत असों. साहेबी कृपालू होऊन येवज राजश्री सुभेदारा- कडून देविला तो हातास येत नाही. साहेब कृपालू होऊन सांभाळ करावयासी धणी साहेब समर्थ आहेत. लग्नामुळे कर्ज जाले. त्याची वोढी बहुत. सर्व प्रकारे सांभाल केला पाहिजे. बगसिंग चंदले साहेबांचे तरफने येथ खलिता घेऊन आले त्याची भेटी राजे माधोसिंगजी याची करून सिष्टाचार सिरपाव देऊन बिदा केले. येथून पुढे जाठाकड जाणार. येका दो रोजात कूच करून गेलियावरी साहेबाचे शेवेसी लिहीत असो. विशेष काय लिहिणे? कृपा वरधीमान केली पाहिजे हे विज्ञापना.
[4227]
4228