Selections from the Peshwa Daftar 29.21: [27-10-1761] Balaji Govind complains to Dadasaheb that he has not been receiving his remuneration from Madhosing who has stopped paying it since Bhausaheb's encounter with the Gilchas. He requests him to write to Holkar to make payment to him so that he can pay the wages of the several messengers in his service.
Selections from the Peshwa Daftar 29.21
- Language
- Marathi
29.21
छ २७ साखर इसने
श्री
पु॥ श्रीमंत राजश्री दादासाहेब
स्वामी साहेबांचे सेवेसी
विज्ञापना ऐसीजे. दोन तीनदां सेवेसी विनंती लिहिली कीं राजे माधोसिंग याजकडून खर्चास रोजमरा पूर्वी मिळत होता तो गिलजी या प्रांतास आला व श्रीमंत भाऊसाहेबासी व त्यासीं जुंज जाले त्या तागाईत रोजमरा राजियांकडून मिळत नाहीं. याहीवर सेवकाजवळ खर्च बहुत, श्रीमंताचे आज्ञेनसार दहा जोड्या * * बातनीस सेवकाजवळ राहतात. जागजागा * * * करितो त्याचाहि रोजमरा (पत्राचा पुढील भाग फाटून गहाळ झाला आहे. त्यानंतर पत्राचे पाठीमागील मजकूर.) * * चिटी आम्हावर पाठवणें. सर * * पोहचते केले जातील तर तसा सावकार कोणी मिळत नाहीं; आणि साहेब तेथोन पाठवितील तर मार्गीत पोहचणार नाहीं याजकरितां संदेह. यास्तव विनंती की इकड़े राजश्री मल्हारजी होळकर आहेत यांजला पत्र सादर होये की राजश्री बालाजी गोंविंद यांसीं खर्चासी याप्रमाणें पावतें करणें. इतके पत्र सादर जाले म्हणजे होळकरांजवल पाठऊन खर्चाची नेमणुकी करून कासिदासी आजपावेतो ऐवज चुकवून देऊं. आजपावेतो कासिदासी आज्ञेप्रमाणें ठेविलें. आतां आज्ञा येईल तर ठेऊ; नाहीं तर दूर करूं. दोन्हीतून येक आज्ञा. व परामृश घेणार साहेब समर्थ आहेत. बहुत काये लिहिणें. कृपा केली पो हे विज्ञाप्ति.