Pramāṇa · Search · About · API

Selections from the Peshwa Daftar 29.20: [27-10-1761] Balaji Govind to Dadasaheb, informing him that the Raja has deputed his Diwan Nandlal to proceed with an army to Nenave and capture it.

Selections from the Peshwa Daftar 29.20

Language
Marathi

29.20

छ २७ राखर इसने

श्रीशंकर

पु॥ श्रीमंत राजश्री दादासाहेब

स्वामी साहेबांचे सेवेसी

विनंती सेवक बालाजी गोविंद कृतानेक साष्टांग नमस्कार विज्ञापना. येथील कुशल तागाईत छ २८ माहे रावल मुकाम नेणर्वे स्वामी साहेबांचे कृपाकटाक्षें यथास्थित असों विशेष. येथील मजकूर तर पूर्वी अजुरदार जोडीसमागमें विनंती पत्रें (पाठविलीं) आहेत, त्यावरून श्रुत जाहलें असेल. सांप्रत इकडील प्र * * * नासी व ब्रम्हपोता यांनीं केशवरायाचे * (पत्राचा पुढील भाग फाटून गहाळ झाला आहे. त्यानंतर पत्राचे पाठीमागील मजकूर.) * * अनायासे उपायाने शत्रूस कमजोर करून टाकावे. राजश्री मल्हारजी होळकरासी पत्र पाठवणार साहेब समर्थ आहेत. तीन दिवसपावेतो मनसबा राहिला. दिवाण नंदलाल यांजला हुकूम केला कीं तुम्ही बमैफौज सुरतरामाजवळ जाऊन शामील व्हा. यावरून नंदलालानी अर्ज केला कीं तिवडियासी आम्हांसमागमें द्या. तिवडियानी राजियासीं म्हटलें कीं माहराज माझे तो काम जुजात जावयाचे नाहीं. दिवाणच जातील. राजियांनीं नंदलालासी आज्ञा केली कीं तुम्हीं नेणवियाची फते करून पाटणासी जा. दिवाणासी रुखसत केलें; तेहि दिवसा येका दोंमधे येथें येणार. आलियावर जे वर्तमान होईल ते सेवेसी विनंती केलें जाईल. वरकड कितेक वर्तमान पुर्वणीवरून श्रुत होईल. बहुत काये लिहिणे ? कृपा केली पाहिजे हे विज्ञाप्ति.