Selections from the Peshwa Daftar 29.85: [23-2-1765] Supplement to a letter informing that hostilities are likely to break out between the Jat and Najibkhan.
Selections from the Peshwa Daftar 29.85
- Language
- Marathi
29.85
श्री
पुरवणी रामकिसन महंत यास बलगडी जावयास सांगितले आणि तोफखाना त्याजबराबर होता त्याबराबर मनुलाल यास सांगाती देऊन निराला जमणाचे किनारे बलगडी पाठविला. याजप्रमाणे ते निघाले. दरमजल गेले. यानंतरी नजीबखान रोहिले रामेरयाचा (रामब्याचा?) घाट उतरून येमुना पार गेले. त्यास शाहाची पत्रे फिरोन आली की खजिना घेऊन लोकर येणे म्हणौन रोहिले यांस पत्रे आलीं. त्यावरून रोहिले पार गेले. याजप्रमाणे येथे वर्तमान आले.
4201 तदनंतर आज गंगाप्रसाद राधाकुंडी गेले आहेत. जाट किल्याची तयार करू लागला आहे. रोहिला येकायेकी जात नाही. किरपाराम वगैरे गेले आहेत. त्याची व यांची बोलणी होऊन जो मजकूर ठरणे तो ठरे. तशाहीमध्ये सिक लागले आहेत त्याचे काये होईल व जाटाकडील वगैरे याजकडील मजकूर ठरयाल(ल्या?)वर जाणार तर जाईल. याजप्रमाणे रोहिले याचा मजकूर आहे. याजप्रमाणे वर्तमान आले आहे. यानंतरि जाट याणी आपले कासिदाचे मिर्थ्यास ताकीद केली की, मराठे याचे बातमीचे पत्र दिवसास येत का नाही याजप्रमाणे चौकसी केली. माहाराजास कलावे. शा छ २ रमजान.
Discussed in (1)
- Fall of the Mughal Empire — Sarkar 1932, English