Pramāṇa · Search · About · API

Selections from the Peshwa Daftar 29.84: [11-3-1768] A priest Balmukund reports the hotly contested battle between Madhosing and Jawahirmal in which the latter's forces were routed.

Selections from the Peshwa Daftar 29.84

Language
Marathi

29.84

पो छ २९ सवाल जाबसूद.

श्री

श्रीमंतं राजश्री विस्वासरावजीप्रति

आश्रित अग्निहोत्री बाल मुकुंद वृत निरोप बहुतां दिवसापासून कृपापत्र आलें नाही तरी चिंता दस्ते. कृपापत्र पाठवूनि चिंता दूरि करावी. श्रीकाशीहूनि आमचे येथे पत्र आले. तीर्थरूप श्रीवास करीत होते. त्यास मुक्ति प्राप्त माघ शुद्ध सप्तमीस झाली म्हणोनि सपिंडी करावयास श्रीवटेश्वरी आलो आहे. विशेष. पूर्वी या प्रांताहूनि जाटाचा अमल पौशमासी उठला. तत्क्षणीच आपणाकडे दोनी माणसे वर्चेवर पाठविलींत. हें लिहिले होते की पत्रदर्शनी फौज या प्रांती सत्वर रवाना करावी. ते त्या समई सत्वरता न झाली. मग आम्ही हे लिहिलें की सनदा भदावर कछवाए धारच्या आपल्या येथे आल्या आहेत त्या कच्चा कीं पक्या लिहा. आपण हे लिहिले कीं सनदा बहुत पक्या आहेत इतकेहि आपण लिहिले. पण फौज थोडीसीहि न पाठविली तो पावेतो बालाजी गोविंद फौजेसहित कछवाए धारेंत आलेत. मागूनि यादवरावजी आलेत तो पावेतो बालाजीपंतताही सरसईचे तालुक्यात पांच शत स्वार पाठविलेत. काशीपंत पाठविलेत ते सर्वाप्रकारची खातरजमा आमचे अधिकारी ग्रहस्तांची करूनि घेअनि गेलेत. कछवाएचे रावराजे आलेत. सर्वांची खातरजमा केली. कमंबेश सर्वांची मामलति केली. त्यासमई आमचे अधिकाऱ्याहि मला दोनी चारिदां पत्रे पाठविलीत बोलाविले. यादवरावजीचेहि पत्र आले. पण मी अटेरिहूनि न गेलो. आमचे ग्रहस्तांची काहीक प्रतीति बालाजीपंताकडे विशेष म्हणोनि मी या प्रसंगात न पडलो. श्रीमंत राजेबहादुराचा प्रसंग जेथे नाही

[+ सर्व पत्र बाळबोध लिपींत आहे.]

4200 तेथे आमसी प्रयोजन नाही. आपण समई फौज न पाठविली तोपावेतो सिंध्याच्या सनदाहि बालाजीपंतायचे येथे आल्यात. इथूनि क्रिया राज्यापासूनि ऐसी केली होती. ज्यांत आमचे ग्रहस्तासी बालाजीपंतासी वणवन होय इतकें केलेहि. पुढेहि बहुत प्रकार कत्यों तोपावेतों त्यहांस सनदा आल्यात. यादवराव कूच करूनि गेलेत. त्यानंतर आपणाकडील वर्तमान कांहींच कलत नाही म्हणोनि दुश्चित्त आहो. यानंतर पश्चिमेकडील वर्तमान ऐसे जे राजे माधवसिंहाची फौज काम्यास आहे. जाटाची फौज पाच कोस डीगेकडे आहे. पाचा कोसाचे अंतर. सिखांची फौज दहाहजार जाटाने बोलाविली ते ठेविली आहे. फाल्गुण शुद्ध १२ सोमवारी एक युद्ध झाले. त्यांत जाट हारलेत. च्यार शत माणस जाट मारले गेलेत. दानसाहि येथे तीराचा घाव आहे. सिखांसुधा जाट पळालेत. माधवसिंघजीची फौज भारी आहे. काही पंधरा सोळा सहस्र आपलेहि सैन्य आहे. आणखी शिंदे होळकर दरमजल येतेत हे आइकतो. हे वर्तमान आपण लिहाल तिन्हां निश्चय वाटेल. जटवाळ्याचे युध्याचे वर्तमान तर सर्वतोमुखी याप्रमाणेच आहे. लिहिले नाही आले. हरकारे गेले आहेत ते दों चौ दिवसात आल्यावर लिहू. देशचे वर्तमान राजेबहादुरांचे व आणखी सरदारांचें या दिवसांत लिहिलें आलें असेल ते लिहावें. हा समय उद्योगाचा आहे. बसूनि राहायाचा नाही. बहुत दिवसापासूनी कृपापत्र आले न होते म्हणोनि माणस पाठविले असे. किंन्हा मिती चैत्र वदि ८ शुक्रे मुकाम श्रीवटेश्वर.

आश्रित जयरामपंत कृतानेक आशीर्वाद कृपा असे हेच अपेक्षा आहे.