Selections from the Peshwa Daftar 29.87: [31-5-1765] Narsingrao Ram explains his difficulties in getting the promised amount from Mahadaji Sindia who at this time is investing Udaipur.
Selections from the Peshwa Daftar 29.87
- Language
- Marathi
29.87
श्री
सेवेसी नरसिंगराऊ राम साष्टांग नमस्कार विज्ञापना. येथील वर्तमान ता॥ ज्येष्ठ शुध येकादसी मु॥ उदेपूर येथे माहाराजाचे कृपावृद्धि करून सेवकाचे वर्तमान यथास्थित असे विशेष. सेवकावर कृपा करून आज्ञा केली की तुम्हास जाऊन सा महिने जाहाले. यैवजाची तरतूद करून सत्वर पाठवणे म्हणून आज्ञा. त्यास येथे येऊन पांच महिने जाहाले परंतु आद्यापि प्रथम दिवस आहे. आम्ही जो उपाये आपणाकडून आहे तितका करितो परंतु काही सिधीस जात नाही. उपास केले, गोटातूनहि निघोन गेलो, लांब जाऊन राहिलो, तरी काही येथील मतलब कळत नाही. बाजी नरसी कारभारी होते ते दुखण्यानी आजपर्यंत हैराण होते. येथून बरे व्हायाकरितां उजनीस जात होते. तेथे वाटेस मंदोसरी ज्येष्ठ शुध चतुर्थीस बुधवारी मृत्य पावले. येथे राघोबा पोतनीस आहेत. सरदाराचा मजकूर काये आहे तो कळत नाही. काही गोष्ट बोलावी ती प्रमाणात नाही. करभारी मातबर म्हणावा तरी दुसरा कोणी नाही. जे आपले मरजीस येईल ते खरे. यैवजाविसी निकड फार केली. त्यास दोन लाख रुपयाच्या हुंड्या आठ दिवसानी करून पाठवितो म्हणून करार केला आहे. येतील तेव्हां खरे. येथे खरी गोष्ट काही आढळत नाही. आजपावेतो भरोसा फार वाटत होता की सरदार चांगला बोलतात हे खरेच असेल परंतु आपणास भरोसा पुरत नाही. चित्तात काये आहे हे कळत नाही. उदेपूरचे कामकाज थोड्यावर आले आहे. मेहनत फार न करिता शहरातील लोक बाहीर निघोन आले. धारण दोसेराची आहे. पाथेदल पांच हजारपावेतो शहरात आहे. ज्या दिवशी पाटीलबाबाचे मरजीस येईल ते दिवशी शहरावर चढाई करितील त्या दिवशी हस्तगत होईल. वाबल्यानी दाहा लाख रुपयाची निशा सरकारात दिडा महिन्यांत रांगड्याकडून करारी करून सरकारात माहाराजाचे नावे खत लिहून घेतले. आम्हापासी रुपयाची निशा करून घ्यावी त्यास करार ठरविला आहे त्याप्रमाणे सरदारकडून कोणती गोष्टी सिधीस गेली नाही. मुदत भरत आली. रुपयाचीहि तरतूद केली आहे. वाबल्याचा निश्चये आहे की मुदतीस रुपये पावले करून देऊ परंतु ज्या गोष्टीनी रुपया मागावा तो आर्थ काही दिसत नाही. तोफा लागू करीत नाही. मोरचे लावीत नाही. उदेपूर घेऊन राजे रतर्नासंगास गादीवर बसवावे ते काही नाही. रुपयाचा मात्र तगादा करितात. याप्रमाणें जानराव व येखंतराऊ वाबले बोलतात. सरदाराचीहि कृपा नाहीसारिखी दिसते. वाबल्याकडे सिकाकडील वकील आले आहे. चालीस हजार
4205 फौजेनसी तुम्हास सामील होतो. जाट व नजीबखान दोघाचे पारपत्य करू. रांगड्या लोकामध्ये व राजेरजवाड्यात उभयेता वाबल्याचा इतबार फार आहे. आपले सरकार उपयोगी आहेत. धण्याची चाकरी करून दाखऊ यैसे म्हणता सध्या दिसोन आली आहे. सरदाराची कृपा विशेष नाही याजकरिता भरोसा पुरत नाही तरी उभयेतास सरकारची पत्रे दिलदिलासा देऊन समाधा(ना)ची पाठविली तरी उपयोगी फार पडतील. उदेपूरचे कामात मातबर तेच आहेत. येथील कच्ची बातमी लिहितो. रागा न यावे. मर्जीस आले तरी सेवेसी लिहून पाठवीन. येथे कासीदजोड्या सरकारच्या येतात. जाब मिलत नाही. महिना दोन महिने उगेच राहात काही काम होऊन येत नाही. पत्रे पाठवितो ही चौकीपार होता की नाही हे कळत नाही. येथील चौकी देहवरीचे (?) बाहेर आहे. तेथे कागदाची चौकसी होऊन मग आला तर ये नाहीतर येत नाही. सर्व वर्तमान मुखजबानी कासीद सांगोतील. सेवेसी श्रुत होई हे विज्ञापना. येथे मिरजा रहीमबेग याची मातबरी पाटीलबाबापासी फार आहे. कोणते काम सिधीस जाऊ देत नाही. कळावे याचा उपाये केला पाहिजे हे विज्ञा(पना).
Discussed in (1)
- Fall of the Mughal Empire — Sarkar 1932, English