Selections from the Peshwa Daftar 3.10: [24-6-1733] Raghunath Hari informs Bajirao that he does not think it possible for the Pratinidhi to capture Gowalkot.
Selections from the Peshwa Daftar 3.10
- Language
- Marathi
3.10
छ २६ सफर
श्री.
श्रीमंत राजश्री पंत प्रधान स्वामीचे शेवेसी.
सेवक रघुनाथ हरी कृतानेक साष्टांग दंडवत प्राा विनंती उपरी येथील कुशल ता॥ छ २२ मोहरम आषाढ वदी अष्टमी इंदुवासर पर्यंत मो॥ खेड यथास्थित असे विशेष. स्वामीनी दोन पत्रे पाठविलीं ती प्रविष्ट होऊन सविस्तर कळले. अजनवेल व गोवलकोटच्या * * * * अर्थ लिया यैश़ास आम्हास स्वामीची आज्ञा ते प्रमाण. बकाजी नाईक व आम्ही सामील चिपळूणास जाहल्यावरी राजश्री पंतप्रतिनिधी बहुता प्रकारें गोंजारीत होते, तथापि आम्ही निघोन आलों. त्याचा कारभार अगदी हरदम जाहला. श्रीच्या पर्वतावरी प्रतिनिधी आहेत. सिदीसाद भेटीस आला होता. भेटोन दगाबाजी करून गेला. आतां फिरोन जुझावयाची उमेद धरितो. हबसी कसा आहेसा प्रस्तूत प्रतिनिधीस कळत चालिला आहे. आम्ही बकाजी नाईक जमावानसी निघोन आलों. या उपरी आठापाचा दिवसांत शामल त्याजवरी छापाहि घालितो. दोन हजार माणूस जमाव त्याजपासी आहेत. धोरिणता हरयेक प्रसंगास बाबूराऊ याजवरीच आहे.
अजनवेल तों दूरच आहे, परंतु गोवलकोटचेहि त्याचे वस्तु काही होत नाहीं. दिवसांत शामल बरा अडला होता, उपराला मदत कोठून होणे नव्हती. प्रतिनिधिपंत आले नसते तरी इतकीया दिवसांत आम्ही मोर्चे देऊन भांडियाच्या मारा. खाले येक दोन बुरूज पाडिले असते. आणिखी पंधरा दिवसी कार्यसिधी होती जैसे असतां प्रजेचा भोग सबल व शामल अदृष्टवान तेणेकरून आम्ही निघोन आलो, पुढे भगवदीछा प्रमाण. पर्जन्याचा मोठा अतिशय, येकक नदीवरी तीनच्यार दिवस उतरावयास लागतात. मजल दरमजल येत असो. स्वामीचे दर्शन होईल तो सुदीन. बहुत काय लिहिणे. कृपा वर्धमान करावी हे विनंती.