Selections from the Peshwa Daftar 3.2: [7-5-1733] Radhabai congratulates Bajirao on his capture of Rajpuri and other places.
Selections from the Peshwa Daftar 3.2
- Language
- Marathi
3.2
श्री.
श्रियासह चिरंजीव विजयीभव राजमान्य राजश्री बाजीराउ यांसी प्रति मातुश्री राधाबाई आशीर्वाद उपरी. येथील कुशल तागाईत ज्येष्ठ शुद्ध पंचमी इंदुवार जाणून स्वकीये लिहीत जाणें विशेष. तुम्ही पत्र पाठविलें तें पावलें, लिहिलें वर्तमान सविस्तर कळलें. राजपुरी व राजकोट व बलाराजा व खोकरी ऐशी हस्तगत जाली म्हणून लिहिलें, तरी हे गोष्ट उत्तमच जाली. सेखजी येऊन भेटला म्हणून लिहिलें तरी ते गोष्ट उत्तमच जाली. त्याचें बहुता रीतीनें समाधान रखून पुढें आपलें कार्य सिद्धीस पावें ते गोष्ट करणें. परस्थळीं जाणें जाहालें आहे, कोणाचा विश्वास न धरावा. बहुत सावधतेनें असणें. शरीरसंरक्षण करून सावधतेनें असत जाणें. बहुत काय लिहिणें हें आशीर्वाद.