Selections from the Peshwa Daftar 3.3: [12-5-1733] Babuji Naik Joshi congratulates Bajirao on the capture of Danda Rajpuri.
Selections from the Peshwa Daftar 3.3
- Language
- Marathi
3.3
श्रीशंकर.
श्रीमंत राजश्री राऊ स्वामीचे सेवेसी
पोष्य बाबूजी नाईक जोसी कृतानेक सा। नमस्कार विनंती. येथील क्षेम ता। जेष्ठ शुध १० पर्यंत औरगाबादेस स्वामीचे कृपावलोकने करून यथास्थित असो विशेष. आजीच पुणियाहून पत्रे आलीं. त्या पत्रीं लिहीले होते कीं, दंडा राजपुरी फते जाली. याैसियास स्वामी पुण्यवान आहेत आणि येशकीर्ती समग्र स्वामीच्या ठाई सदैैव वास्तव्य करिते तेथे हा प्रकार काय थोर म्हणावा ? याहून आणखी महद्यशे पदरी पडतील. हे वर्तमान यैकौन परम हर्ष जाला. याउपर त्या प्रांतीचे सविस्तर वृत्त पत्री लिहून विशेषात्कार हर्ष होये यैसे केले पाहिजे. श्रीमंतू राजश्री आपा स्वामीकडून पत्रे आली ती पाठविलीं आहेत. त्यावरून लेखनाभिप्राय समक्ष होईल. बहूत काय लिहिणें हे विनंती. जेष्ठ शु १० शनिवार.