Pramāṇa · Search · About · API

Selections from the Peshwa Daftar 1.s2-70: [6-2-1760] The writer suggests the forage parties of the enemy to be stopped.

Selections from the Peshwa Daftar 1.s2-70

Language
Marathi

1.s2-70

श्री.

पौ.

पो छ १८ जमादिलाखर

सेवेसी विज्ञापना. चिठी पाठविली. प्रविष्ट होऊन लेखनार्थ अवगत जाहला. मोगलाची कही जाऊ न द्यावी म्हणौन आज्ञा. त्यास तेणेप्रमाणे फौजसुधा

[* यापुढील मजकूर राघोबाच्या हातचा आहे, त्यावरून पत्र राघोबाचें होतें हें निश्चित आहे.]

Ca 50-7 येऊन बसलों आहों. कहींचे लोकास बाहेर निघों देत नाहीं. येतात त्यास ताकीद करून माघारे लावीन आहों. कारकूनसमागमे आज्ञा आली कीं, तुम्हीं व बाबूजी नाईक जेथे आहां तेथे राहाणे. त्यास आमचा मुकाम जेथे आहो तेथे करविला. सेवेसी विदीत होये हे विज्ञाप्ती.