Pramāṇa · Search · About · API

Selections from the Peshwa Daftar 1.s2-74: [Feb. 1760] The whole letter is in Nana Purandare's handwriting.

Selections from the Peshwa Daftar 1.s2-74

Language
Marathi

1.s2-74

श्री.

* विनंती उपरी. आम्ही दोन कांस आलो आहों. येथून मोगलाचे लस्कर कोस दीड आहे. चौक्याहि जागा जागा बसविल्या आहेत. जवळ बाण टाकावयासीहि पाठविले आहेत. प्रातःकाळीं भोजनोत्तर सत्वरच यावयाचें करावें. बुनगे तेथेच तयार असूं द्यावे; तो आम्ही मोगलाचे कूच मुकाम प्रातःकाळीं लिहून पाठवितो. आपण राहिले आहेत तेथून मोगलाचे लस्कर तीन साडेतीन कोस लांब आहे. त्यामध्यें वोढे खोंडे फारच आहेत, हे विनंती.