Selections from the Peshwa Daftar 1.s2-79: [3-2-1760] The letter describes the havoc played by the artillery under Ibrahimkhan into the enemy's camp, and also the precarious condition of the enemy.
Selections from the Peshwa Daftar 1.s2-79
- Language
- Marathi
1.s2-79
श्री.
पौ॥ छ २० जमादिलाखर
माघ सितैन.
श्रीमंत राजश्री पंतप्रधान साहेबांचे
सेवेसी
विनंती सेवक मोराजी शिंदे मुकाम राजपुरी. चरणावर मस्तक ठेऊन शिर साष्टांग दंडवत विनंती विज्ञापना. ता॥ छ १५ जमादिलाखर पावेतों साहेबांचे कृपादृष्टी करून सेवकाचें वर्तमान यथास्थित असें विशेष. साहेबांचे आज्ञापत्र छ ७ जमादिलाखरचें सादर जालें. तेथें आज्ञा जे मोगल उदगिरीवरी आहे. त्याचें लष्करावरी सरकारच्या तोफा लागू होऊन पौष्य वद्य द्वादशीस मंगळवारी तोंफाचा मार दिला. गोंले सलाबतजंगाचे डेऱ्यापुढें जाऊन माणसे, घोडी, बैल जाया जाहाले. तेव्हां त्यानी डेरे उपटून पलीकडे नेलें. मार तोंफांचा न राहीच, तेव्हां त्याजकडील गाडदी पुढें आले. मग सरकारचे इभ्रामखान वगैरे गाडदी त्याजवरी चालून गेलें. गाड्या गाड्यांची लढाई जाली. इभ्रामखान यांणीं फारच दम धरून टहरून लढले. जुंज बरेंच जाहलें. त्याजकडील शे सत्राशे गाडदी जखमी व ठार जाहालें. पांच सात जमातदारही त्याजकडील चांगले पडले. सरकारचेही दोनशे पावेतों गाडदी जखमी व ठार जाहालें. च्याळीस पन्नास जाहले. प्रस्तुत मोगल किल्ल्यावर आश्रा करून विचारात पडला आहे. दाणा वैरणीचे संकट त्यास आहे. याप्रकारचें वर्तमान आहे, म्हणोन आज्ञापत्र सादर जाहले. त्यास साहेबाचे पुण्ये प्रतापंकरून शत्रु पराभवाते पावती़ल. सेवेसी श्रुत होय. हे विज्ञाप्ति.