Selections from the Peshwa Daftar 1.s2-80: [7-2-1760] Wagh writes news of Janoji Bhonsle's movements to Sadashivrao.
Selections from the Peshwa Daftar 1.s2-80
- Language
- Marathi
1.s2-80
श्रीगजानन.
सेवेसी विनंती. सेवक मल्हार चितामण सा॥ नमस्कार विनंती. येथील क्षेम ता॥ छ १९ जमादिलाखर च्यार घटका रात्र मु॥ आंबे सरकारची पत्रे सलुख्याची रदबदली लागली म्हणौन व येथून कूच जालियाउपर हला करावी लागते. तर जलदीने आज यऊन पोहचणे म्हणोन आज्ञा. यैशाम आज्ञापत्र सादर होताच कूच करीत होते. परंतु च्यार घटका दिवस राहिला. याजकरिता मुकाम केला. उदईक प्रहर रात्री कूच करून दर्शनास येणार. बिघाड आसावा. आपले चाकरीचा मजुरा घडावा. यैसे इच्छा फार आहे. आज तमाम लोकास ताकीद केली आहे. सामाने बाधोन आपलाले मि . . . . . सेवेसी श्रुत होये हे विज्ञापना . . . . . जी बावा चौ कोसावर परलीचा घाट चढोन आले; म्हणौन वर्तमान येथे आहे. हे विज्ञापना.
[१ गाडून उभे राहून.]