Selections from the Peshwa Daftar 1.s2-81: [7-2-1760] The writer describes the attitude of the Bhonsle brothers.
Selections from the Peshwa Daftar 1.s2-81
- Language
- Marathi
1.s2-81
श्रीगजानन.
पो॥ छ २२ जमादिलाखर
सेवेसी विनंती. सेवक मल्हार चिंतामण वाघ कृतानेक सां नमस्कार विनंती विज्ञापना. येथील क्षम ता॥ माघ वद्य ६ गुरुवार संध्याकाल मु॥ जोगाईचे आंबें स्वामींचे कृपेकरून वर्तमान यथास्थित आसे. यानंतर आज्ञापत्र सादर जाले. तेथे आज्ञा जे तिसा कोसाची मजल करून लौकर येऊन पोहचणे. यैशास आज्ञेप्रमाणे लाब लाब मंजली करून मु॥ मजकुरास आले. उदईक प्रहर सा घटका दिवसांन सेवेसी येऊन पोहचतात. फौजेत धमक फार आहे. सेवेसी श्रुत होये हे विज्ञापना. हे जुझ मातबर जाले. सल्यावर गोष्ट पडली. आपण समयास आंतरलो म्हणौन बहूत सई जाले. ईस्वर बिघाड करून आमची उजागरी करील तर उत्तम आहे, म्हणौन हे इच्छा करितात. यास यैसा प्रकार वडीन येईल, यैसा भरवसा नवता. गुदस्त्या याचे त्याचे जुज जाले होते. त्याचे मर्दुमीचीच तारीफ करीत होते. परंतु स्वामींचे पुण्य समर्थ. येणे करून सर्व कल्याणरूप होऊन येते. हे विज्ञापना.
54