Selections from the Peshwa Daftar 1.s2-82: [7-4-1760] Capture of the fort Daulatabad, communicated by Gopalrao Patwardhan to Govindrao Limaye Khasgiwale.
Selections from the Peshwa Daftar 1.s2-82
- Language
- Marathi
1.s2-82
श्रीगणराज.
छ २० साबान चैत्र सितैन.
राजेश्री गोविंदराव तात्या स्वामीचे सेवेसी.
पो गोपाल गोविंद नमस्कार विनंती उपरी. आजी सोमवारीं च्यार घटी रात्रीं किल्ले दौलताबादेत सरकारचे लोक मांकोट दरवाजांत गेले. रात्र जाली. आंतील लोक निघून पावले. यास्तव दरवाजांत ठेविले. प्रातःकाळीं आंत जातील. मुख्य किल्ला स्वाधीन जाला. याउपर कांहीं गुंता नाहीं. मुख्य माहाकोट दरवाजा आमचे स्वाधीन जाला. बहुत काय लिहिणे ? हे विनंति.