Pramāṇa · Search · About · API

Selections from the Peshwa Daftar 1.s2-83: [11-2-1760] Sadashivrao writes to the Peshwa the terms of the treaty that he had offered to Nizam.

Selections from the Peshwa Daftar 1.s2-83

Language
Marathi

1.s2-83

श्री.

चिरंजीवाचे पत्राची

नकल छ २९ जाखर

सेवेशीं विनंति. दौलताबाद किला नवाबाजवळून करार करून घेऊन किल्लेदारास पत्र नबाबाचे मोहरेनसी घेतले. तेच पत्र सेवेसी पाठविलें आहे. घ्यावे आणि राजश्री गोपालरायासारखा शाहाणा माणूस लोक देऊन पाठवावे. किल्लेदारास परवाना द्यावा आणि लोक किल्ल्यांवर चढवावे. येथे नवाबापासी तिलमात्र गुंता राहिला नाहीं. जाजती जागिरीचा कुन्हा मध्यस्तासीं असा नवाच काढून बोललों कीं पंचेचालीस लाखाची जागीर कबूल केलीत. परंतु आमची चौथाई वजा करून पंचेचालीस भरून द्यावे. याप्रमाणे नेटी लाऊन जाबसाल केला. तेव्हा हाही प्रकार कबूल जाले. पंधरा लाख जाजती जाहालें. येकूण साठ लक्ष करार जाहाले. यशी साठ लक्ष करार जाहाले. हे जाजती व्हावयास कारण हेच कीं विठल सुंदर नवाबाजवळून बरतरफ करवीत होतों. तेव्हा विठल सुंदराचा पेगाम बजीद होऊन आला कीं सर्व प्रकारें पदरचा आहे. कृपा करावी. चांकरी करून दाखवीन. पुढें सर्व प्रकार निष्ठेने वर्तणूक करीन. यैसे बोलू लागले. तेव्हा ही नवी जागीर जाजती, हा चौथाईचा कुन्हा ठेऊन पंधराची कबूल करविली. व दौलताबाद किला घेतला. येणेप्रों करून विठलपंतार्नी निजामअलिखानापासीं राहून आमचे मर्जीप्रो वर्तणूक करावी. चालावे. तिलमात्र अंतर पडू देऊ नये. याप्रो शफतपूर्वक केलें. तदोतर विठलपंतास निजामअलिखानापासीं राहाविले. येविसी निजामअलि-खानाची रदबदल दाट होती, येकाविसी जाहाली, व आपले कांहीं जाजतीं चांगलें जाहाले, यास्तव केलें सविस्तर स्वामीस कळावें. किल्लेदारीची सनद मागाहून पाठवितों. तूर्त इनायेतनामा पाठविला आहे. हा पुढे पाठवावा व लोक पाठवावे. गा छ २३ जालावर. हे विनंति. किल्याच्या आसाम्या येथे नेमल्या आहेत. यास्तव तेथे कोणास देऊ नये. आसेर, बरानपुर, मोले येथील (स) नदा देऊन, बच्च्याजी-पंतास हजार फौज कणेन गा केलें. विजापुरची सनद नागोरामांस बसलत-जंगाकडे हजार फौजे देऊन पहिले गा केलें. त्याकडे गा परवाना पाठविला कीं जागा खालीं करून देनों. पंचेतालीस सिवाय चोथायात पंधरा होतात. दाहाचे बोलोनच आहे. पंधराचेही होईल. परंतु सेवटी जालियावर सेवेसी लिहून. हे विनंति.

[१ कुन्हा = खोंच, कपट.]

[२ बोली.]