Selections from the Peshwa Daftar 1.s2-84: [13-2-1760] The writer, a Muhammadan, congratulates the Peshwa on the success at Udgir and praises the bravery displayed by Bhausaheb.
Selections from the Peshwa Daftar 1.s2-84
- Language
- Marathi
1.s2-84
श्री.
पौ छ २४ जमादिलावल
सितैन.
रावसाहेब मेहरवान सुखलीशान सलामत.
छ वादज शौक मुलाकान बाह्रजत आयात मशहूद खातरबाद येथील खैरसला जाणून आपली खैर आफियत हमेशा लिहून दिल ताजा करीत असावे. दिगर छ १७ जमादिलावल रोजी वर्तमान ऐकिलें जे श्रीमंत भाऊ साहेबी आपणच मोगलाचे लष्करांत युध्याचा प्रसंग गेला. त्यास कितेक हानीनसीन सरदार निकडील दस्तगीर जाले. बहुत उत्तम प्रकारें श्रीमंतांचे लोकांनीं फते केली. यासी श्रीमंताचा प्रताप महिमा ऐसा आहे कीं जिकडे सरकारची फौज जात आहे तिकडे फतेच होऊन येती. ज्या कामावर आपण खुद बदवलत कमरबंदी केली असेल तेथ फते हाथ जोडून निघून उभी राहील. हे वर्तमान ऐकोन चितास बहुत खुशी हासील जाली. ईश्वर हे फतेची खबर सर्व खैरखैवा लोकास मुबारक करो. आपणाकडील वर्तमान लवकर कळत नाहीं यास्तव चित चिंताग्रस्त असते. तर सविस्तर आपले खैर आफियतचे वर्तमान पाठवीत असावे, की चिताचे समाधान होत जाईल. ज्यादा काय लिहिणे. प्यार मोहबत असो दीजे. हे कित़ाबत.
[१ आज्ञापत्र, शिफारसपत्र.]
[२ विजय.]
[३ खैरख्वा = खुशाली. खैर आफियत = खुशाली.]