Pramāṇa · Search · About · API

Selections from the Peshwa Daftar 1.s2-85: [15-2-1760] The writer Ragho Bapuji is deputed to take possession of the province of Ambad by the Peshwa. He complains against Mudhoji Bhonsle arresting the Patil of the place, and asks for his release.

Selections from the Peshwa Daftar 1.s2-85

Language
Marathi

1.s2-85

श्री.

छ ५ रजब सीतैन

श्रीमंत राजश्री भाऊसाहेब स्वामीचे सेवेसी. विनति सेवक राघो बापूजी कृतानेक साष्टांग नमस्कार विनति विज्ञापना. येथील वर्तमान छ २७ जाखर मु॥ नजीक आबड स्वामीचे कृपेकडुन यथास्थित असे. यानंतर श्रीमंत राजश्री नानासाहेब याणी प्रो मारचे जमीस फौजसुधा पां आहे. त्यासी येथे येऊन येथील जमीचा फडशा रा। पांडुरंग सिवदेव याचे मारफतीने वाइद्याने उरकिला आहे. त्यास मौजे पाटोदे प्रो आबाड येथील (पाटील) रा। मुधोजी भोसले सेनाधुरंधर याणी गावमारास घासदाण्याचा रोखा करून धरून नेला आहे. त्याजकडे घासदाणा रु. ४०० चारसे करार करून गावास जासुद वसुलास पां आहे. आणि पाटील मार यास बोलेस लस्करात ठेवले आहे. त्यास येथे गावक़री सदरहु रु॥ मजुरा मागतात. येतदविशी पाटील मारास सोडून द्यावयाची व रु। न मागणे म्हणून आज्ञा करणार स्वामी धणी समर्थ आहेत. सेवेसी श्रुत होय. हे विज्ञप्ति.