Selections from the Peshwa Daftar 1.s2-86: [16-2-1760] News-letter from a spy sent by the Peshwa into the Nizam's camp. The ultimate result of the campaign turned out to be as hollow as this spy forecasted.
Selections from the Peshwa Daftar 1.s2-86
- Language
- Marathi
1.s2-86
श्री.
पो २८ जमादिलाकर
सितैन माघ शुक्रवार.
श्रीमंत महाराज राजश्री भाऊसाहेब स्वामीचे चरण सेवेसी. सेवक आज्ञाधारक सिवराम आनंदराव सां। नमस्कार विनंती उपरी. काली नवाबाकडील जासूद-
Ca 50-8 माहालात सहज वर्तमानास्तव गेलो होतो. ते स्थली आमचा स्नेहस्त खंडोजी ना। याची भेटी जाहली. त्यासी आपण विचारिल कीं श्रीमंताची व नवाबाची सांप्रती बोली चालीचा प्रसंग सित्यांत जो करार जाहला आहे ते गोस्टी करार वाके चालेल की न चालेल. तुमचे दृष्टीस कैस दिसतें; म्हणोन विचारिल असतां त्यानी उतर दिल्ह कीं मोगलाची जात काबूची. समये पाहोन लेकी (खी?) देऊन घात करणार. त्यानी वेलावर दृष्टी देऊन तुम्ही जे मागतील ते गोस्टी त्यानी कबूल जाहाले आहेत. शेवटप्रांत होणार नाहीं. तीघ भाऊ येक जागा होऊन, मराठी फौज रा। जानबा व वेंकटराव व खंडागले वगैर अमीर लोक बिछेंडले आहेत, त्या आवघ्यास मिलवोन घेऊन मागती येकदां हरशामृश करतील; हे गोस्टी निजामअलीखा याचे चिती आहे. बोदोन दाखवीत नाहींत. होणार जे असल तें चुकत नाहीं. परंतु रंग जैसा दिसोन येतो. ईस्वराचे चित्तीं जे असेल ते होईल. याप्रमाणे बोली आइकली; आणि बशालतजंगाचे वर्तमान तरी आलंद व गुंजोटी विध्वंश करीत अवशाकडे * * * * आहेत; त्यासमागमे पठाण व मुरापुरचा बेडर आहे, आणि माघोन रा। मुरारजी घोरपडेहि आले म्हणोन बोलवा आइकली. दाहा बारा हजार फौज चांगली, व गारदी प्यादे दाहा हजार, व तोफ लहान थोर ४०, व जेजाला तीन च्यारसे, सामान चांगल आहे, म्हणोन बोलवा आइकली. सेवेसी कळावें म्हणोन लिहीले अस. स्वामींचीथे वर्तमान वरचेवर येत असल. सेवकान आइकैल ते वर्तमान सेवेसी निवेदन करावें लागतें. रा। जाधवराव यानी परवा घोडी व हती गुलामअली कर्जदाराचे भरीस दिल्हा म्हणोन लिहील होते, त्या गोष्टीचा शोध घेता वर्तमान आइकिल की माहाराज त्याचे भेटीस येणार. भेटीस आल्यानंतर तो हती करितां भीड पडल्या देण लागल. यास्तव लटकी कर्जदार उभा करून, पागाचे सात आठ घोडी चांगली व हती गुलामआली पठाणाकडे ठेविले; आणि निजामअलीखा यानी येक हती थोर जाधवराव यांसी पाठविला आहे. कही कबाड बैल घोडी आजी मागती राजश्री बाबूजी नाईक याचे गोटाकडे लस्करचे लोक गेले. रस्त तो रोज बरोज येत जाते. सेवेसी कलावे. महाराज पुण्यश्लोकी. आपण सेवक पदरचे असो. आपल वर्तमान सेवेसी विदित्य आहे. हे विनंती.
[१ विवउळे.]
[२ स्वामींचे येथे.]