Pramāṇa · Search · About · API

Selections from the Peshwa Daftar 2.100: [3-5-1759] The writer Bal Govind reports to Raghunathrao the arrangements made by the Scindia in the Punjab.

Selections from the Peshwa Daftar 2.100

Language
Marathi

2.100

श्रीवरद.

पौ छ १९ सवाल ऊर्फ

जेस्ट वद्य २

श्रीमंत राजश्री दादासाहेब

महाराजाचे सेवेसी

आज्ञाधारक बाळ गोविंद दंडवत विज्ञापना. येथील कुशल ता॥ छ ५ माहे रमजान मुकाम इंद्रपस्त यथास्थित जाणून स्वानंदोछव लिही ती आज्ञा केली पाहिजे विशेष. बहूत दिवस जाहाले. माहाराजाकडून पत्र येऊन वर्तमान कळत नाहीं. तेणे करून चित संचित असे. तर सर्वदा पत्री सांभाळ केला पाहिजे. यानंतर इकडील वर्तमान तर, रा॥ जनकोजी सिंदे माछीवाडीयावरी आहेत. रा॥ शाबाजी पाटील यासी लाहोर प्रांती पाठविले होते; त्यास त्याजला बोलावून घेतले. रा॥ नारी शकर यासी लाहोर प्रातीचे कामकाज सागितले. आपण माछीवाडीयाहून माघारे फिरले. यैसी वदंता आहे. रा॥ गोविंद बळाल दिलीस आले होतेत त्यास पातशाहा वजिराची मुलाजत जाली. आठ दाहा मुकाम केले. उपरातिक छ २ रोजी दिल्लीहून कूच करून रा॥ जनकोजी सिंदे याजकडे गेले. रा॥ आताजीपंतहि सिंदीयाचे लष्कराहून दिल्लीसमीप आले. येका दोन दिवसा दिल्लीस येतील. माहाराजाचे भेटीस बहूत दिवस जाहाले. त्यास हेत बहूत आहे. त्यास ईश्वरसत्याने ते प्रांतीच सत्वरच येऊन भेटी घेऊं. कृपा करणार माहाराज समर्थ आहेत. बहूत काये लिहिणे हे विज्ञाप्ति.