Selections from the Peshwa Daftar 2.99: [30-8-1758]
Selections from the Peshwa Daftar 2.99
- Language
- Marathi
2.99
श्री.
पौ छ २४ जिल्काद
पुरवणी श्रीमंत राजश्री दादासाहेब
स्वामीचे सेवेसी.
विज्ञापना यैसीजे. पत्री आज्ञा आली की तुम्ही सरकार कामे करावी. इतबार आपला वाढवावा. तो न वाढविता गमाविला. यादी तुम्हाजवळ दिल्या होत्या. यादी प्रा॥ कामे गया वगैरे करून पाठवावी ते अद्यापि कामे जाली नाहींत. म्हणून आज्ञापत्री आली त्यास ज्या प्रा॥ स्वामीची आज्ञा यादीची आहे त्या प्रा॥ कामे करून मजुरा करून देऊ. परंतु स्वामी कृपा विशेष जालियावर हिमतीने कामे बहुत होतात. त्यास यांजला येथे मातबर दबाव बसलियाखेरीज डोले उघडत नाहीं. दुसरे खासा स्वारी देशास गेलियावर मागे यानी दंगाच केला. याजमुळे कामे करावयास फुरसत न जाली. वरकड सर्व प्रताप स्वामीचा आहे. स्वामीचा तेजोप्रकासे करून हिमालयपर्य्यत छत्र फिरते. तेथे येथील कामे आशक काय आहे ? स्वामीचा वरदहस्त आमचे मस्तकी आहे. तरी यादी प्रो॥ कामे सर्व होऊन येतील. दिवसगत दगियामुळे लागेल. सर्व प्रा॥ कृपा करणार स्वामी समर्थ आहेत १ सेवेसी श्रुत होये हे विनंती. २
[१ या पुढील मजकूर निराळ्या वळणाचा. अक्षर फार कापरें आहे.]
[२ इ. स. १७५८ ना नंतरचें पत्र असावें.]