Selections from the Peshwa Daftar 2.101: [15-5-1759] Jankoji Scindia's letter describing his doings in Rajputana.
Selections from the Peshwa Daftar 2.101
- Language
- Marathi
2.101
श्री.
छ ५ सवाल तिसा
श्रीमंत राजश्री पंत प्रधान स्वामीचे सेवेसी विनंती सेवक जनकोजी सिंदे कृतानेक दंडवत विज्ञापना. सेवकाचें वर्तमान ता॥ छ १७ साबान मोकाम शतद्रु स्वामीचे कृपावलोकनें करून यथास्थीत असे विशेष. सरकारचे आज्ञापत्रें छ १९ जमादिलावलचे पाठविलें ते छ २ रजबी सादर जालें. तेथें आज्ञा राणाजीकडील मामलतीविसी व कोथ्याकडील व मारवाडप्रांतींचा बंदोबस्त सत्वर करून लाहोराकडील व बंगाल्याकडील मनसबें मातबर असता पुष्कराभोवती बहुत 'दिवसे लाविले, काये काये कामें केली, त्याचा तपशील खंडणी वसूल काये, हे काहीच लिहिलें नाहीं. मोघम लिहिलें तरी सविस्तर लिहीत जाणे म्हणोन आज्ञा. ऐसियास आज्ञेप्रमाणे राणाकडील व कोथ्याकडील व मारवाडचा बंदोबस्त जो जाला त्याप्रमाणे पूर्वी सेवेसी विनंती तपशीलवार लिहिलें असें ती पत्रे पावली असतील त्यावरून विदीत होईल. लाहूरचे वर्तमान आलाहिदा पुरवणी पत्री विनंती लिहिली असें. त्यावरून श्रृत होईल. येथून कूंच करून पुढे जो कर्तव्य अर्थ मनसब्याचा जेसा योजून येईल त्याप्रमाणे सेवेसी मागाहून लेहून पाठवू. सेवेसी श्रुत होय हे विज्ञाति.
Discussed in (1)
- Fall of the Mughal Empire — Sarkar 1932, English